अख्खा मसूर(akha masoor recipe in marathi)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपअख्खा मसूर
  2. 2 टेबलस्पूनकोथिंबीर (चिरलेली)
  3. 3-4लसुन पाकळया
  4. 1 इंचआलं
  5. 1/2 टीस्पूनजिरे
  6. 1 टेबलस्पूनखोब्रा किस
  7. 1/2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 1कांदा (चिरलेला)
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    मसूर रात्रभर भीजत घाला,सकाळी पाण्याने स्वच्छ धुवुन घ्या आणि कुकर मध्ये टाका, त्यात पानी घाला आणि 3-4 शिटया करून शिजवुन घ्या.

  2. 2

    आता मिक्सर च्या भांडयामध्ये चिरलेली कोथिंबीर,लसुन,आलं,खोब्रा किस,जिरे घाला आणि छान बारीक मसाला वाटुन घ्या.

  3. 3

    आता एका प्यान मध्ये तेल गरम करा त्यात मोहरी घाला आणि छान तडतडू दया.आता त्यात कांदा घाला आणि छान सोनेरी होइपर्यंत परतून घ्या.

  4. 4

    आता त्यात वाटलेला मसाला घाला आणि तो छान परतुन घ्या.मसाला छान परतुन झाला की त्यात हळद,तिखट घाला आणि व्यवस्थित एकत्र करुन घ्या.

  5. 5

    आता इच्छेप्रमाणे पानी आणि चवीनुसार मीठ घाला आणि एक उकळी येईपर्यंत शिजवुन घ्या.अख्खा मसूर ची भाजी तयार आहे.

  6. 6

    गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर खायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes