अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#ccs अख्खा मसूर म्हटलं कि कोल्हापूर च डोळ्यांसमोर आलं पाहिजे :) तर अशी कोल्हापूरची फेमस डिश झणझणीत कांदा लसूण मसाला वापरून बनवली आहे :)

अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)

#ccs अख्खा मसूर म्हटलं कि कोल्हापूर च डोळ्यांसमोर आलं पाहिजे :) तर अशी कोल्हापूरची फेमस डिश झणझणीत कांदा लसूण मसाला वापरून बनवली आहे :)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा ते पाऊण तास
४ व्यक्तींसाठी
  1. 3/4 वाटीअख्खे मसूर
  2. भिजत घालण्यासाठी आणि शिजवायला आवश्यकतेनुसार पाणी
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1/2सुक्या खोबऱ्याची कवड
  6. 6-7लसूण पाकळ्या
  7. 1/2 इंचआलं
  8. 2हिरव्या तिखट मिरच्या
  9. 1/4 वाटीपुदिना
  10. 1/2 वाटीकोथिंबीर
  11. 1 चमचाकांदा लसूण मसाला (तिखट जास्त हवं असल्यास प्रमाण वाढवावं)
  12. 2 चमचेघरचा लाल तिखट मसाला
  13. 2-3 चमचेखाद्यतेल
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

अर्धा ते पाऊण तास
  1. 1

    पाऊण वाटी अख्खे मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवले. सकाळी २-३ वेळा स्वछ पाण्याने धुवून घेतले. एका भांड्यात २ वाट्या पाणी उकळवून घेतलं त्यात धुतलेले मसूर अर्धातास ठेवून दिले.

  2. 2

    १ कांदा, १ टोमॅटो, अर्धी सुक्या खोबऱ्याची कवड, ६-७ लसूण पाकळ्या आगीवर भाजून घेतलं. त्यामुळे स्मोकी फ्लेवर येईल ग्रेव्ही ला.

  3. 3

    भाजलेला १ कांदा, १ टोमॅटो, अर्धी सुक्या खोबऱ्याची कवड, ६-७ लसूण पाकळ्या सोबत अर्धा इंच आलं, २ हिरव्या तिखट मिरच्या, पाव वाटी पुदिना आणि थोडी कोथिंबीर कापून मिक्सर ला लावली आणि वाटण बनवून घेतलं. वाटण करताना थोडं मीठ टाकलं.

  4. 4

    कढईत २-३ चमचे खाद्यतेल तापवून त्यात १ चमचा कांदा लसूण मसाला (तिखट जास्त हवं असल्यास प्रमाण वाढवावं) आणि २ चमचे घरचा लाल तिखट मसाला टाकून फोडणी द्यायची. मसाला तेलावर टाकताना आच मंद असेल याची काळजी घ्यावी. तेलावर मसाला फुटू लागला कि त्यात वाटण घालायचं. मिक्स करून झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यावी.

  5. 5

    एक उकळी आली कि त्यात उकळलेल्या पाण्यात ठेवलेले मसूर उकळीवर सोडायचे. तेच पाणी गरजेनुसार मसूर सोबत ऍड करायचं.
    गरज वाटल्यास मीठ टाकायचं. झाकणावर पाणी ठेवून १० मिनिटं मिश्रण शिजू द्यायचं. १० मिनिटांनी एकदा ढवळून मसूर शिजल्याची खात्री करायची. गॅस बंद करून उरलेली चिरलेली कोथिंबीर भुरभूरवून वाफाळत्या भातासोबत अख्खा मसूर सर्व्ह करायची. सोबत तोंडीला घरचं दही असेल तर उत्तम :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes