अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#kdr
अख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे.

अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)

#kdr
अख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 लोकांकरिता
  1. 1 वाटीअख्खे मसूर
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनबेसन
  5. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  7. 1 चमचाप्रत्येकी गरम मसाला पावडर, लाल तिखट
  8. 1/2 टीस्पून हळद
  9. फोडणीसाठी - आवश्यकतेनुसार तेल
  10. 1 टीस्पून जीरे
  11. 7-8 कडीपत्त्याची पाने
  12. मूठभरचिरलेली कोथंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पाण्यात मसूर 4-5 तास भिजत घालावेत.

  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून, त्यात सांगितल्याप्रमाणे सर्व फोडणीचे साहित्य घालावे. बेसन ब्राऊन रंगावर परतून झाले की, कांदा परतावा कांदा लालसर मऊ परतून झाल्यावर टोमॅटो घालावा. सर्व साहित्य छान परतून झाल्यावर आले - लसूण परतावे.

  3. 3

    सर्व साहित्य परतून झाल्यावर भिजवजलेले मसूर घालावेत. मसूर परतून झाल्यावर चवीनुसार मीठ घालावे. झाकण झाकून एक वाफ आणावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजू दयावी.

  4. 4

    मसुरची उसळ दाटसर झाली की, वरून कोथंबीर पेरवी. तयार अख्खा मसूर चपाती, रोटी, भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes