निनाव (ninav recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#shravanqueen
#रेसिपीबुक
#week6
Post 1
श्रावण महिना म्हणजे सणांचा/व्रतांचा महिना. श्रावण महिन्यात रोजच वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याचे महत्त्व आहे जसे श्रावणीसोमवारी श्री शंकराची मनोभावे पूजा केली जाते व शिवामूठ वाहतात. मंगळवारी येणारी मंगळागौर हेसुद्धा नवविवाहित स्त्री लग्नानंतर पाच वर्ष पूजा करते. पाचव्या वर्षी मंगळागौरीचे उद्यापन केले जाते व रात्री जागरण केले जाते. रात्रीच्या जागरणाच्या वेळी पारंपारिक खेळ बायकांकडून खेळले जातात. बुधवारी पांढरे बुधवार असा उपास केला जातो त्यादिवशी पांढरे वस्त्र घालण्याची परंपरा आहे व जेवणात सुद्धा दूध भात, दही भात खाऊन उपवास सोडला जातो . गुरुवारी बृहस्पति ची पूजा केली जाते. शुक्रवारी आपल्यापासून लहानांना जिवतीची पूजा करून वाण देण्याची परंपरा आहे. श्रावण महिना सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या महिन्यात श्री सत्यनारायणाची पुजा सुद्धा केली जाते. नागपंचमी, कृष्ण जन्म म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शितळा सप्तमीला वाण देण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी लोकांकडून समुद्रात नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते व दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावांचा सण साजरा होतो. श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्या आणि अमावस्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दाट्याला निनाव पदार्थ केला जातो.

निनाव हा पदार्थ सिकेपी लोकांचा पारंपारिक पदार्थ आहे .जीवतिचा जो नारळ ठेवला जातो त्या पासून निनाव हा पदार्थ करण्याचे परंपरा आहे .यात चण्याची डाळ, गहू, गुळ, नारळाचे दूध, वेलची पावडर, तुप, बदाम वापरुन निनाव तयार करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
५व्यक्तींसाठी
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1/2 कपगहू
  3. 2 कपनारळाचे दूध
  4. 1 कपगूळ (किसून घेणे)
  5. 1/4 कपतूप
  6. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  7. १५ बदामाचे काप
  8. 12काजूचे तुकडे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    चण्याची डाळ व गहू 15 ते 20 मिनिटे भाजून घेणे व व मिक्सर मध्ये रव्या प्रमाणेबारीक करून घेणे. आता कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचं व चण्याचे बारीक करून घेतलेले पीठ घालून पाच ते सात मिनिटे तुपावर भाजून घ्या

  2. 2

    आता त्यात त्यात नारळाचे दूध घाला व व्यवस्थित ढवळून ते एकत्र करून घ्या नारळाचे दूध मिश्रणात आटले की आता त्यात गूळ घाला. गुळ व्यवस्थित मिश्रणात विरघळला कि त्यात काजूचे काप, वेलची पावडर व जायफळ पावडर घाला

  3. 3

    आता तयार झालेले हे मिश्रण आपल्याला केक प्रमाणे बेक करुन घ्यायचे आहे त्यासाठी केकटीन मध्ये किंवा एखाद्या डब्यात थोडासा तुपाचा हात लावून त्यावर बटर पेपर लावा व तयार केलेले मिश्रण या टीनमध्ये काढून घ्या. वरून बदामाचे केलेले काप घालून घ्या.

  4. 4

    कुकर मध्ये बेक करण्यासाठी कूकरच्या तळाशी मीठ घालून त्यावर एक स्टेन्ड ठेवा व पाच ते दहा मिनिटे प्रेहीट करून घ्या. प्रेहीट झाल्यावर हे तयार केलेले टीन कुकर मध्ये ठेवा व 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्या. वरून व बाजूने चांगले खरपूस लालसर रंगावर बेक झाले की टीन कुकरमधून काढून त्याचे चौकोनी काप करून घ्या. (मायक्रोवेव्ह मध्ये बेक करणार असाल तर 180° ला २० ते २५ मिनिटे बेक करुन घ्या.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes