रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचणाडाळ
  2. 1/2 वाटीगहू
  3. 1 वाटीकिसलेला गूळ
  4. 1 चमचावेलची पूड
  5. 7-8ड्रायफ्रूट काजू बदाम
  6. 2 वाटीनारळाचं दूध
  7. 2 चमचेते तूप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम एका कढाईत चणाडाळ आणि गहू घेऊन लालसर रंगावर भाजून घ्यावं.नंतर चणाडाळ आणि गहू थंड झालं की की मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यावं.

  2. 2

    आता एका कढईत तूप घ्या.तूप गरम झाले की, त्यात तयार चणाडाळ आणि गव्हाचे मिश्रण घालून छान लालसर रंगावर भाजून घ्या.

  3. 3

    आता तयार मिश्रणात दोन वाट्या नारळाचं दूध घाला व हलवत रहा.नंतर त्यात एक वाटी गूळ आणि वेलचीपूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.

  4. 4

    आता एक कढई दहा मिनिटांसाठी गॅसवर प्रि-हीट करून घ्या. केक टीन अथवा कुकर चे भांडे घेऊन त्या भांड्याला तुपाचा हात लावावा आणि वरती बटर पेपर ठेवावा अथवा थोडासा मैदा पसरवून घ्यावा.

  5. 5

    नंतर तयार मिश्रण त्या भांड्यात घाला..वरून ड्रायफ्रूट घालून छान सेट करून घ्या.नंतर तयार मिश्रण दहा ते वीस मिनिटं पर्यंत बेक करून घ्या.वीस मिनिटांनंतर गॅस बंद.करा.मिश्रण थंड झाले कि एका प्लेट मध्ये हे ठेवून त्याच्या चौकोनी वड्या कापून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes