निनाव (ninav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चना डाळ आणि गहू एकत्र दहा मिनिटे भाजून घ्यावे व त्याचे सरबरीत पीठ करून घ्यावे. एका नॉनस्टीक पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप घ्यावे व गरम झाल्यावर त्यात चणाडाळ आणि गहू चे मिश्रण टाकावे.
हे मिश्रण दहा मिनिटे भाजून घ्यावे. - 2
हे मिश्रण तूप सोडेपर्यंत भाजावे व त्यात नारळाचे दूध टाकावे.
दुध आटेपर्यंत मिश्रण हलवत रहावे.
दूध आटल्यानंतर त्यात गुळाची पावडर ऍड करावी. - 3
गुळाची पावडर पाच मिनिटे विरघळल्यानंतर गॅस बंद करावा.
हे मिश्रण एका बेकिंग टिनमध्ये तूप ग्रीसिंग करून काढून घ्यावे.
त्यावर काजू व बदामाचे काप ॲड करावे.
एकीकडे कुकर घ्यावे व त्यात मीठ टाकून त्यात एक छोटे स्टँड साठी वाटी ठेवावे.
या वाटीवर आपले बेकिंग टीन ठेवून पंधरा ते वीस मिनिटे बेक होऊ द्यावे.
बेक झाल्यानंतर आपली साहित्य थंड होऊ द्यावे व या केक चे फुलाच्या आकाराने काप करून घ्यावे.
आपली नीनाव रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapनीलन राजे ताईंची सीकेपी पद्धतीची निनाव ही रेसिपी अप्रतिमच आहे!!!..त्यातील ओल्या नारळाच्या फ्रेश दूधाची चव खूपच छान लागते. Priyanka Sudesh -
निनावं (ninav recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Nalinraje, यांची रेसिपी मी बनविली. ती खूप छान झाली. Vrunda Shende -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक#week6Post 1श्रावण महिना म्हणजे सणांचा/व्रतांचा महिना. श्रावण महिन्यात रोजच वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याचे महत्त्व आहे जसे श्रावणीसोमवारी श्री शंकराची मनोभावे पूजा केली जाते व शिवामूठ वाहतात. मंगळवारी येणारी मंगळागौर हेसुद्धा नवविवाहित स्त्री लग्नानंतर पाच वर्ष पूजा करते. पाचव्या वर्षी मंगळागौरीचे उद्यापन केले जाते व रात्री जागरण केले जाते. रात्रीच्या जागरणाच्या वेळी पारंपारिक खेळ बायकांकडून खेळले जातात. बुधवारी पांढरे बुधवार असा उपास केला जातो त्यादिवशी पांढरे वस्त्र घालण्याची परंपरा आहे व जेवणात सुद्धा दूध भात, दही भात खाऊन उपवास सोडला जातो . गुरुवारी बृहस्पति ची पूजा केली जाते. शुक्रवारी आपल्यापासून लहानांना जिवतीची पूजा करून वाण देण्याची परंपरा आहे. श्रावण महिना सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या महिन्यात श्री सत्यनारायणाची पुजा सुद्धा केली जाते. नागपंचमी, कृष्ण जन्म म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शितळा सप्तमीला वाण देण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी लोकांकडून समुद्रात नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते व दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावांचा सण साजरा होतो. श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्या आणि अमावस्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दाट्याला निनाव पदार्थ केला जातो.निनाव हा पदार्थ सिकेपी लोकांचा पारंपारिक पदार्थ आहे .जीवतिचा जो नारळ ठेवला जातो त्या पासून निनाव हा पदार्थ करण्याचे परंपरा आहे .यात चण्याची डाळ, गहू, गुळ, नारळाचे दूध, वेलची पावडर, तुप, बदाम वापरुन निनाव तयार करतात. Nilan Raje -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर#निलन राजे#cooksnap निनाव हि रेसिपी मी पहिल्यांदा बनवली आहे .थँक्यू निलन राजे ज्यांनी आपली सुंदर रेसिपी आमच्याबरोबर शेअर केली. यावेळेस अंकिता मॅम नि चंद्रकोर खूप छान theme ठेवली .रेसिपी बनवायला खूप मजा आली. माझ्या मुलीने सुद्धा मला हेल्प केली. Najnin Khan -
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी नीलन राजे ताई यांची रेसिपी खूप छान केलेली आहे. माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच व त्याचं नाव सुद्धा प्रथमच ऐकलेलं आहे. रेसिपी जरी पहिल्यांदाच केली पण घरी सर्वांना अतिशय आवडली आणि खूप छान टेस्टी झाली. चला तर मग बघूया कशी केली ती😊 Shweta Amle -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapनिलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी पाहिला व चाखायला मिळाली. त्यात मी थोडासा बदल करून हि रेसेपी बनवली आहे मी यामध्ये मखानांचा चापर केला आहे Shilpa Limbkar -
-
... निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#NilanRaje यांची रेसिपी मी cooksnap करुन बघितली... निनाव नावाची आणि हा पदार्थ कधी खाला नसल्याने जास्त न करता थोडासाच केला. कारण चव माहीत नव्हती.. पण निलन ताई रेसिपी केल्यावर छान झाली. घरातील सर्वाना आवडली. जेवढी रेसिपी चांगली तेवढीच ती हेल्दी आणि पौष्टिक असल्याने मला जास्त आवडली. त्याबद्दल नीलन ताई धन्यवाद...हो आणखी एक प्लेटीग करताना थोडा बदल केला.. तो कसा वाटला नक्की सांगा. माझ्या कडे जायफळ नसल्याने मी यात घातले नाही.. तूम्ही नक्की घाला Vasudha Gudhe -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी -1 निलन राजे मॅडम नी शिकविलेली रेसिपी खूप छान आहे. वेगळया चवीची.सीकेपी पदार्थ शिकायला मिळाला. Sujata Gengaje -
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #कुकस्नॅप #nilanrajeमी पहिल्यांदा हा पदार्थ केला. खूप छान स्वादिष्ट झाला.निनाव हा नवीनच पदार्थ आहे माझ्यासाठी.मी इथे घराच्या आकार कापून घेतले, काही चौकोनी वड्या व काही वड्या हाताने कुस्करून त्याचे तूपाचा हलक्या हाताने लाडू वळून घेतले. हे लाडू मी माझ्या सासूला दिले. तिला ते स्वादिष्ट लागले. नंतर माझ्या सासूने तिच्या मुलीला फोन करून माझ्या लाडवाचं कौतुक केले. माझी सासू कोणाबद्दलही फारसे कौतुक करत नाही. निलन राजे ही निनाव रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. 🙏 Pranjal Kotkar -
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #कूकस्नॅप# नीलन राजे यांनी शिकवलेली निनावं ही रेसिपी करुन पाहिली खूपच छान झाली, माझ्या घरच्यांना ही भरपूर आवडली. Sushma Shendarkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen .पोस्ट -1 चंद्रकोर#Cooksnap....आज मी नीलन राजेंची रेसीपी रेसिपीबूक साठी कूकस्नँप केली .... Varsha Deshpande -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#shravanqueen#cooksnap निलन राजे यांची रेसीपी cooksnap केली आहे. Kalpana D.Chavan -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपी.#shravanqueenरवाकेक सारखीच हि रेसिपी ही हेल्दी आणि पौष्टिक आहे. हे खाल्यावरही यातील पदार्थ ओळखणे कठीण होते. Supriya Devkar -
चंद्रकोरी निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week6 #चंद्रकोरनिलन राजे यांची निनाव ही रेसिपी मी #cooksnap केली आहे.हे निनाव घरी सगळ्यांना खूप आवडलं. करताना फारच छान वाटलं. एवढी छान रेसिपी कुकपॅडमुळे करायला मिळाली. खूप धन्यवाद 🙏 Ujwala Rangnekar -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव कधी न ऐकली किंवा खाल्लेली असा हा पदार्थ बनवायला आणि खायला मिळाला. खुप छान चवीला पण आणि नाव पण Swayampak by Tanaya -
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen #nilan raje#cooksnapनिनाव हा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला पण आता नीलन राजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे करून बघितला अतिशय सुंदर असा हा पदार्थ शिकायला मिळाला त्यामुळे सर्वप्रथम कूक पड चे आभारआम्हाला अशा नवीन नवीन पारंपरिक पाककृती शिकायला मिळतात आणि नवीन नवीन ऐकायला सुद्धा मिळतात कुठे कसे प्रकारचे पदार्थ बनतात त्यामुळे खूप खूप धन्यवाद Maya Bawane Damai -
निनाव (ninaw recipe in marathi)
#shravanqueenआज दीप अमावस्या म्हणजेच दीप पूजन, आज आमच्या इथे जिवती आई ची पूजा केली जाते आणि आई आपल्या मुलांच्या स्वास्थ आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करते, संध्याकाळी मुलांना पाठावर बसवून कुंकू लावून गूळ खोबरं देते. लग्नाआधी माझी मम्मी द्यायची, लग्नानंतर माझी सासूबाई मला मुलगी म्हणून गूळ खोबरं देते, सध्या ह्या दोघी माझ्या जवळ नसल्याने त्यांच्या आठवणीत ही गूळ खोबरं असलेली स्वीट डिश बनवतीये. आज पासून श्रावणांच्या सणांना सुरुवात होते तर काही तरी गोड धोड केले जाते, तर आज मी नीलन राजे यांची निनाव देवांच्या नैवेद्याला केले. खूपच छान आहे ह्याची रेसिपी आणि सोप्पी पण आहे, मला तर मज्जा आली बनवायला आणि ताईंनी सांगितल्या प्रमाणे मी नारळाचेच दूध वापरले त्यामुळे खूपच छान चव आली निनाव ला आणि निनाव बनवताना तर घरभर खूपच छान वास सुटला होता. Pallavi Maudekar Parate -
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen#नीलन राजे#कूकस्नपनिनाव हा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला बघून फार कठीण वाटत होत पण केल्यावर वाटलं सोप्पं आहे नीलन राजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे करून बघितला अतिशय सुंदर असा हा पदार्थ शिकायला मिळाला त्यामुळे सर्वप्रथम कूक पड चे आभार.Dhanashree Suki Padte
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#shravanqueen चंद्रकोरनिनाव ही पारंपरिक पाककृती असून ती पिठोरी अमावस्येला बनवली जाते प्रसाद म्हणून.ही पाककृती कोळश्यावर बनवली जाते, खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी ही पाककृती आपण आज कुकर मध्ये बनवणार आहोत,निनाव ची टेस्ट पारंपरिक जशी असते तशी यावी यासाठी मी इथे थोडा स्मोकी फ्लेवर दिला आहे. तर पाहूयात निनाव ची पाककृती. Shilpa Wani -
नीनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueenनिनाव....ना त्याला काही नाव नसावे असे हे नीनाव... ही सीकेपी स्टाईल डिश मला आमचे सीकेपी शेजारी खळे तसेच माझी वर्ग मैत्रीण भिसे या दोघांकडून खायला मिळाली होती पण प्रत्यक्ष कधी ती मी बनवून पहिली नव्हती..... आज आपल्या निलन ताईंमुळे ती बनविण्याचा योग आला....आणि निनावं छान जमले सुद्धा... घरी सर्वांना आवडले. वाटले नव्हते कधी ते मला करता येईल असे.... नीलन ताईंना माझ्या कडून तसेच माझ्या परिवाराकडून मना पासून धन्यवाद 🙏 Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या