निनाव (ninav recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#shravanqueen #cooksnap मी नीलन राजे ताई यांची रेसिपी खूप छान केलेली आहे. माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच व त्याचं नाव सुद्धा प्रथमच ऐकलेलं आहे. रेसिपी जरी पहिल्यांदाच केली पण घरी सर्वांना अतिशय आवडली आणि खूप छान टेस्टी झाली. चला तर मग बघूया कशी केली ती😊

निनाव (ninav recipe in marathi)

#shravanqueen #cooksnap मी नीलन राजे ताई यांची रेसिपी खूप छान केलेली आहे. माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच व त्याचं नाव सुद्धा प्रथमच ऐकलेलं आहे. रेसिपी जरी पहिल्यांदाच केली पण घरी सर्वांना अतिशय आवडली आणि खूप छान टेस्टी झाली. चला तर मग बघूया कशी केली ती😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1/2 कपगहू
  3. 2 कपनारळाचे दूध
  4. 1 कपगूळ (किसलेला)
  5. 1/4तूप
  6. 1 टेबल स्पूनवेलची पावडर
  7. 1/2 टीस्पूनजायफळ पावडर
  8. 2 टेबल स्पूनकाजू,बदाम, पिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम ओल्या नारळाचे दूध तयार करून घेणे. आणि चणाडाळ आणि गव्हाला आधी भाजून घेणे. नंतर मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणे. मग एका कढईमध्ये तूप टाकून दोन्ही बारीक केलेली चणाडाळ व गव्हाचे पीठ टाकून तुपामध्ये छान खमंग भाजून घेणे. भाजून झाल्यावर त्यामध्ये नारळाचं दूध टाकून छान परतवून शिजू देणे.

  2. 2

    दूध छान आटलं की, त्यामध्ये किसलेला गुळ टाकणे. गूळ छान मिक्स झाला की, त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड टाकून मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    आता बेकिंग ट्रेला ला तूप लावून, त्यावर बटर पेपर टाकून परत तूप लावून घ्यावे. व हे तयार केलेलं निनाव चे मिश्रण त्या प्लेटवर छान सेट करून घ्यावे. त्यावर काजू,बदाम पिस्त्याचे तुकडे टाकून छान दाबून घ्यावे.

  4. 4

    आता एका कढईमध्ये खालती मीठ टाकून त्यावर स्टॅन्ड ठेवून झाकण लावून प्रिहीट होऊ देणे. प्री-हीट झाल्यावर स्टॅंडवर हा बेकिंग ट्रे ठेवावा व वीस मिनिटे मिडीयम गॅसवर होऊ द्यावा.

  5. 5

    वीस मिनिट झाले की बेकिंग ट्रेला बाहेर काढून त्याच्या वड्या कापून घ्याव्यात. आता आपले निनाव खाण्यासाठी रेडी आहेत. खूप छान लागतात, तर नक्की करून बघा..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes