टोमॅटो आलुबोंडा (tomato aloo bonda recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक week 5
पावसाळी गंमत,
या वातावरण तळलेले पदार्थांची मज्जा काही निराळीच आहे...
मला दरवर्षी पावसाची जास्त वाट असते, कारण मला दरवर्षी पाऊस अंगावर घ्यायला अतिशय आवडतो,
छान जोरात पाऊस असला की मी टेरेसवर जातो आणि छान पावसात ओली चिंब होते आणि पावसाची मजा घेते,,
कित्ती छान वाटते त्या पावसामध्ये भिजण्यात,,,
आणि मग भिजून आल्यावर आंघोळ केल्यावर गरम गरम आलू बोंडे, भजी, ब्रेड पकोडे असे निरनिराळे तळणी चे पदार्थ खावेसे वाटतात,
आणि गरम गरम चहा आणि कॉफी सोबत त्याची मजा काही निराळीच आहे...
वा वा काय छान...
आपली माझ्या आपल्या हातात असते म्हणून मस्त मजा करून घ्या खाऊन पिऊन घ्या ,
पण नेहमी नेहमी फ्राय केलेले पदार्थ आरोग्याला चांगले नाही बरं...
कधीकधी आणि स्पेशली पावसाळ्यात बरं असतं मजा घेण्यासाठी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 4मध्यम आकाराचे टोमॅटो
  2. 2मध्यम आकाराचे बटाटे
  3. 4लसून पाकळ्या
  4. 1/2 कपबेसन
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनजिरे
  9. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1/4 टीस्पूनकाळे मिरे पावडर
  12. आलुबोंडा तळण्यासाठी तेल
  13. 1 टेबलस्पूनतेल भाजी करण्यासाठी
  14. चवीपुरते मीठ
  15. 1 टीस्पूनसाखर
  16. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य काढून घेणे, बटाटे उकडून घेणे, आणि बेसन मधे पाणी घालून थीक बॅटल तयार करून घेणे, त्या मधे चवीपुरतं मीठ, आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यावे...

  2. 2

    आता गॅसवर कढई ठेवणे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालावे, तेल तापले की त्यामध्ये मोहरी जिरं लसूण घालून अर्धा मिनिट परतून घ्यावे,, सर्व कोरडे मसाले घालून मिक्स करून घ्यावे आणि त्यामध्ये बटाटे उकडलेले घालून घ्यावे, चवीपुरते मिठ आणि साखर घालून चांगलं एकजीव करून घ्यावे, परतून घ्यावे चांगले..

  3. 3

    टोमॅटो च्या देठाच्या भागाला छोटे छिद्र करायचं त्याच्या मधला सगळा गर, बिया काढून घ्यावे, टोमॅटोला पोकळ करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण केलेली बटाट्याची भाजी भरून घ्यायची,

  4. 4

    आता टोमॅटो ला बेसनच्या बॅटल मध्ये घोळवून घ्यावे, गरम तेलामध्ये तळण्यास सोडावे..

  5. 5

    छान खरपूस तळून घ्यावे, पाणी गरम गरम कुठल्याही चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे...पाऊस सुरू असताना या टोमॅटो अनुभवण्याची मजा काही वेगळीच आहे मी तर विदाऊट सॉस चटणी असेच खाते... हॅपी कुकिंग...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes