पाकातील चंद्रकला

Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830

# रेसीपीबुक # week 6
चंद्र मनाचा कारक, म्हणूनच प्रत्येकाच्या मनातील त्याच स्थानही विशेषच!!
लहानपणापासून आपण त्याच्याबद्दल अनेक गोष्टी, गाणी, भावगीते, प्रेमगीते टप्प्याटप्प्याने ऐकत आलो, त्याचे व आपले एक नाते बनून आपण त्याला "चांदोमामा " नावाने लडिवाळ हाक मारून लागलो
"चांदोमामा चांदोमामा भागलास का लिंबोनिच्या झाडामागे लपलास का " आईच्या, आजीच्या गाण्यातील हाच "चांदोमामा" आज रेसीपीत अवतरलाय
चला तर रेसीपीकडे वळूयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनीेटे
  1. ८० ग्रॅम बारीक रवा
  2. ५० ग्रॅम दही
  3. १०० ग्रॅम साखर
  4. १२० मिली पाणी
  5. 2 टिस्पून तूप
  6. चिमूटभरमीठ
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

३०मिनीेटे
  1. 1

    मीठ, रवा व तूप चांगले हातावर चोळून मिक्स करा

  2. 2

    आता दही घालून मळा व गोळा बनवून १० मिनिटे झाकून ठेवावे

  3. 3

    एका बाजूला वरती दिलेल्या प्रमाणानुसार पाक बनवायला ठेवा साखर विरघळे पर्यंत हलवा व चिकट होईपर्यंत पाक होउ द्या (एकतारी पाकाची गरज नाही)

  4. 4

    एका कढईत तेल तापत ठेवा व वरील पिठाचे चपाती प्रमाने गोळे करून लाटा व झाकणाच्या साहाय्याने कट करा

  5. 5

    पुन्हा पुरीवर झाकणाच्या साहाय्याने कट द्या व चंद्रकोर बनवा

  6. 6

    पुरी, चंद्रकोर तेलात तळून घ्या

  7. 7

    पुरी, चंद्रकोर काढून गरमागरम पाकात २ मिनीटे घोळवून बाहेर काढा

  8. 8

    खाण्यासाठी तयार आहेत पाकातील चंद्रकला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes