क्रीम चीज कुकीज (cream cheese cookies recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक
#चंद्रकोर रेसिपीज
Week 6,
भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राचे महत्त्व खूप जास्त आहे..
आजही आपले सण आणि उत्सव हे चंद्र दिनदर्शिकेप्रमाणे साजरे केले जातात,,
उदाहरणार्थ नारळीपौर्णिमा, गणेश चतुर्थी, कोजागिरी पौर्णिमा, भाऊबीज असे अनेक सण आहे...
फार पूर्वीपासून चंद्र हा कवी जणांना खुणवत आलेला आहे, अनेक प्रेम गीतांमधून चंद्राचा उल्लेख झालेला आहे,
कुठे चंद्रा ला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिली जाते, तर कुठे चंद्राच्या साक्षी ने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या आढळतात,
लहान मुलांच्या गान्या मध्ये ही चंद्राला विशेष स्थान आहे, चंद्र म्हणजे लहान मुलांचा मामा, त्याच्या आईचा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात अशी आपल्याकडे प्रथा आहे,
करवाचौथ या उत्तर भारतीय व्रतामध्ये इथल्या स्त्रिया नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी पीठ गाळण्याच्या चाळणीतून चंद्र आधी बघतात, मग त्या व्रत तोडतात आणि जेवतात...
असे म्हणतात की श्रीरामाने चंद्रासाठी हट्ट केला होता "की चंद्र मला पाहिजे " म्हणून तेव्हाच सुमंत यांनी आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खूष केले,अशाखूप गोष्टी
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राचे खूप जास्त महत्त्व आहे..
"सूर्य" आपला "पिता" आणि "चंद्र" आपली "आई" असे आपल्या इथे बोलल्या जाते,,
आणि खरच ते बरोबर पण आहे,, वडील हे सूर्यासारखे तेजस्वी आणि कडक असायलाच पाहिजे,, आणि वडील हे आपल्याला सूर्या सारखेच वाटतात, आई ही चंद्रासारखी सुस्वरूप आणि माया करणारी असतेच😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपपीठी साखर
  3. 1/3 कपतूप
  4. 2 टेबल्स्पूनदूध
  5. 1/2क्रिम चीज
  6. 1/4 कपदही
  7. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  10. 2 टेबलस्पूनपिठीसाखर कुकीजवर वरून गार्निशिंगसाठी

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    सर्वप्रथम मैदा पिठीसाखर मीठ बेकिंग पावडर हे काढून बाजूला ठेवणे, एका बोल मध्ये तूप क्रिम चीज चांगले फेटून घ्यावे,

  2. 2

    आता त्यामध्ये दही, दूध, व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटून घ्यावे,,

  3. 3

    आता त्यामध्ये कोरडे मिश्रण म्हणजे मैदा, साखर, बेकिंग पावडर, मीठ यांचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या,, आणि आणि त्याचा गोळा तयार करून घ्या..

  4. 4

    फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आकार द्यावा चंद्रकोर सारखा... आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून देणे, फ्री-हीट ओव्हन करून घ्या दहा मिनिटांसाठी...

  5. 5

    आता प्रि हीटेड ओव्हनमध्ये कन्वेक्शन मोडवर 150 डिग्रीवर वीस ते पंचवीस मिनिटांसाठी बेक करण्यास ठेवून देणे... इथे बेकिंग चा टाईम कमी जास्त तुम्ही करू शकता... वीस ते पंचवीस मिनिटानंतर कुकीज तयार आहेत, त्यांना थंड होऊ द्यावे,,

  6. 6

    कुकिस थंड झाल्यावर वरून चाळणीने पावडर शुगर कुकीज वर पसरवावे,,

  7. 7

    आता क्रीम चीज कुकीज तयार आहेत...हे खाण्याचा अतिशय सुंदर लागतात,,पण जर का पाच सहा तासानंतर खाल्लं तर जास्त चांगले लागतील,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या (8)

Similar Recipes