चटपटीत श्रावण घेवडा..😋 (shrawani ghewada recipe inmarathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#रेसिपीबुक #Week6
#चंद्रकोर रेसिपी..
श्रावण महिन्यातील या आठवडयासाठी दोन चंद्रकोर रेसिपी पैकी एक गोडाची रेसिपी .. खोबर्याचे घारगे केलं..आता दुसरी तिखट, चटपटीत, चमचमीत रेसिपी करावी हे मनात होतं..पण काय करावं हे सुचत नव्हतं..
श्रवण महिना हा खास व्रवैकल्याचा महिना...पूजा,रोज नैवेद्य..असा क्रम चालूच असतो..आज गुरुवार ..म्हणून जिवतीच्या फोटोमधील बुध बृहस्पतींची पूजा नैवेद्य .. बृहस्पति म्हणजे गुरु..गुरुदेव दत्त..गुरुदेव दत्तांना घेवड्याची भाजी नैवेद्यात करतात हे गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे.. म्हणून मी घेवडा निवडत बसले होते..एकीकडे दुसरी चंद्रकोर रेसिपी काय करावी हे मनात चालले होते..अचानक लक्षात आलं..अरेच्चा घेवड्याचा आकार तर चंद्रकोरी सारखाच आहे...मग ठरवलंच की घेवड्याची चमचमीत चटपटीत रेसिपी करायची...सगळे trial n error पडताळून पाहिले..कशी करावी ही रेसिपी?? ...असं म्हणता म्हणता हे असं करावं का...ऊ हुं..हे नको..मग तसं करु या..असं म्हणता म्हणता माझी गाडी घेवड्याचा side dish म्हणा किंवा starter म्हणा या विचाराशी येऊन थांबली एकदाची..
ज्यांना घेवडा आवडत नाही..त्यांना पण ही रेसिपी नक्कीच आवडेल.. घेवड्यामध्ये iron लोह असते.. ते खूप आवश्यक असते शरीरासाठी..कारण शेवटी आहार हेच औषध ..
चला तर मग या रेसिपी साठी माझी विचारांची नौका मी कशी वल्हवली ते सांगते ..फार कष्ट नाही लागतं या रेसिपीसाठी...झटपट...आवडली रेसिपी तर जरुर कमेंट करा..आणि करुन पहा चटपटीत घेवडा😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्राम श्रावणवघेवडा
  2. 2 तीळ भाजलेले
  3. 3 टीस्पून तिखट
  4. 3 टीस्पून आमचूर पावडर
  5. चवीनुसारमीठ
  6. फोडणीचे साहित्य
  7. कोथिंबीर सजावटीसाठी
  8. तळण्यासाठी तेल
  9. ओलं किंवा सुकं खोबरं

कुकिंग सूचना

15-20मिनीटे
  1. 1

    आधी घेवडा स्वच्छ धुवून त्याच्या अलगद शिरा काढून घ्या..घेवड्याचा चंद्रकोरीचा राहिला पाहिजे म्हणून घाई करु नये.

  2. 2

    आता कढईत तेल तापवून घ्यावे..आणि त्यात घेवडा तळून घ्या..तळताना gas low ठेवा.काही वेळेस त्यातील बिया फुटून बाहेर येतात..म्हणून तळताना gas पासून थोडं लांब उभं राहावं..सगळा घेवडा तळून घ्यावा.घेवड्याचा हिरवा रंग बदलला नाही पाहिजे इतपत तळा.

  3. 3

    आता तळलेल्या घेवड्यावर तिखट मीठ,आमचूर पावडर,भाजलेले तीळ घालून हलकेच एकजीव करा..

  4. 4

    एकीकडे पळीत तेल,मोहरी,जिरं,हिंग,हळद तीळ घालून खमंग फोडणी करून घ्या.आणि ती गार झाल्यावर घेवड्यावर पसरवा..आणि हलक्या हाताने मिक्स करा.

  5. 5

    प्लेट मध्ये घेवडा arrange करुन वर कोथिंबीर खोबरं घालून सर्व्ह करा चटपटीत श्रावण घेवडा..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (10)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
Shravan ghevda mhanje normal ghevadach asto na
Ki vegala asto.
Mi market madhe vicharala tar mala sangitala, wo sab apne yaha pe nahi milta

Similar Recipes