गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसिपीबुक # week 6
चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी.

गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)

#रेसिपीबुक # week 6
चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
  2. 150 ग्रॅम गूळ
  3. 6खारीक चे तुकडे
  4. 2 टीस्पूनसुक खोबऱ्याचा किस
  5. 2 टीस्पूनकाळे मनुके
  6. 1 टीस्पूनवेलचीपूड
  7. 4 टीस्पूनसाजूक तूप
  8. 200 ग्रॅम गव्हाचं पीठ
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. पाणी
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

50 मिनिटं
  1. 1

    गव्हाचे पिठात मीठ आणि पाणी घालून घट्ट मळून घ्या.

  2. 2

    भाजके शेंगदाणे, गूळ, खारीकचे तुकडे मिक्सर मधून बारीक करून घ्या.

  3. 3

    खिसलेले खबरे, काळे मनुके आणि वेलची पूड त्यात घालून हाताने मिक्स करा. हे करंजीचे सारण तयार झाले.

  4. 4

    कणकेची छोटी गोळी करून गव्हाच पीठ लावून तळ हाता एवढी म्हणजे पुरी सारखी लटूनघ्या.

  5. 5

    कठाला सारण लागणार नाही याची काळजी घेत त्या पुरीच्या अर्ध्या भागात चमच्याने सारण घालून कडेने पाण्याचे बोट लावून दुसरी अर्धी बाजू त्या सरणावर काठाला काठ लागेल अशी दाबून चिकटवून घ्या.

  6. 6

    कडेने करंजी च्या चमच्याने त्याला कापा. आणि करंजीच्या कडेच कणीक काढून टाका.

  7. 7

    आता कढईत तेल माध्यम आचेवर तापवून घ्या. तेल तापले कि करंजी दोन्ही बाजूने तळून घ्या.थोडी फिकट चॉकलेटी रंगाची झाली कि बाहेर काढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes