गोविंद लाडू (govind ladoo recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#रेसिपीबुक #week7
सात्विक रेसिपी 1
अतिशय झटपट होणारी,आणि रुचकर अशी ही पाककृती आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

25मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमपोहे
  2. 100 ग्रॅमशेंगदाणे
  3. 1 वाटीखिसलेले खोबरे
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. 1 वाटीगूळ
  6. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  7. 1 टेबलस्पूनतूप
  8. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य घ्या. खोबरे खिसून घ्या, गूळ खिसुन घ्या.

  2. 2

    एका कढई मध्ये प्रथम शेंगदाणे भाजा, मग पोहे भाजून घ्या, छान क्रिस्पी झाले कि काढून घ्या.आता त्याच कढई मध्ये खोबरे चा खिस आणि खसखस भाजा.

  3. 3

    आता सर्व पदार्थ थंड झाले कि मिक्सर मध्ये बारीक करायचे, प्रथम पोहे बारीक करा मग शेंगदाणे आणि नंतर खोबरे आणि खसखस.

  4. 4

    आता हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात गूळ घालायचा, पुन्हा मिक्सर मध्ये चांगले बारीक करायचे कि त्याच पदार्थांचे तेल त्याला सुटेल

  5. 5

    यात अगदीच वाटले तर तूप घाला अन्यथा गरज नाही, आता लाडू वळून घ्या.छान महिनाभर टिकतात हे लाडू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (5)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
आम्ही तीळपोहे लाडू म्हणतो.
आजीकडे घाणा चालायचा न् ती करायची

यांनी लिहिलेले

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes