अळूचं फदफदं - पारंपरिक सात्विक भाजी (alooch fadfad recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week7
#सात्विक
भाजीच्या अळूची कोवळी पानं आणि देठ घालून ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची सात्विक भाजी कांदा लसूण न घालता केलेली. चिंच, गूळ, गोडा मसाला घालून केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. नैवेद्याच्या पानात, लग्न समारंभाच्या भोजनात ही भाजी केली जाते. एवढ्या चविष्ट भाजीला असं विचित्र नाव का दिलंय माहित नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

360 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. १८-२०अळूची पानं
  2. 1/4 कपकच्चे शेंगदाणे
  3. 1/4 कपकाजूगर
  4. 1 टीस्पूनतांदुळाचं पीठ
  5. 1/2-3/4 टीस्पूनगोडा मसाला
  6. 2 टीस्पूनचिरलेला गूळ
  7. 4सुक्या लाल मिरच्या (मधे चीर देऊन)
  8. ७-८ पानंकढीपत्ता
  9. ४-५मेथीदाणे
  10. 1 टेबलस्पूनताजा खवलेला नारळ
  11. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  12. 1/4 टीस्पूनमोहरी
  13. चवीनुसारमीठ
  14. 1 टेबलस्पूनतेल
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

360 मि
  1. 1

    शेंगदाणे आणि काजूगर वेगवेगळे भांड्यात ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवा.

  2. 2

    अळूची पानं नीट धुवून बारीक चिरून घ्या. पानांचे देठ धुवून सोलून घ्या आणि बारीक चिरून घ्या.

  3. 3

    अळूची पानं आणि देठ एका पातेल्यात घाला; त्यात पाणी घालू नका. भिजवलेले काजू दुसऱ्या पातेल्यात घाला; अर्धा कप पाणी घाला. दोन्ही प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

  4. 4

    भिजवलेले शेंगदाणे १ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. शेंगदाणे शिजायला जास्त वेळ लागतो.

  5. 5

    शिजवलेलं अळू गरम असतानाच त्यात तांदुळाचं पीठ घाला आणि मिश्रण चमच्याने घोटून एकजीव करा.

  6. 6

    एका कढईत तेल घालून मोहरी, हळद, हिंग, मेथीदाणे, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून खमंग फोडणी करा.

  7. 7

    फोडणीत अळू घाला. चिंचेचा कोळ घाला. मिश्रण ढवळून घ्या.

  8. 8

    शिजवलेले शेंगदाणे आणि काजू दोन्ही पाण्यासकट घाला.

  9. 9

    मीठ, गूळ, गोडा मसाला, नारळ घालून मिश्रण ढवळून घ्या. एक उकळी काढा.

  10. 10

    मिश्रण फार दाट असेल तर पाणी घालून उकळी काढा. ही भाजी आमटीपेक्षा दाट असते.

  11. 11

    ५ मिनिटं उकळून गॅस बंद करा.

  12. 12

    अळूचं चविष्ट फदफदं तयार आहे. गरमगरम भाजी पोळी / भाताबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes