पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#shr
#श्रावण_स्पेशल
"अळूच फदफदं"

श्रावणात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात.श्रावणी सोमवारी उपवास सोडायला अळूची वडी ही बनतेच.पण आवडीनुसार अळूच फदफदं ही बहुतेक घरांमध्ये बनवले जाते.. म्हणून आज मी पण बनवले आहे.

पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)

#shr
#श्रावण_स्पेशल
"अळूच फदफदं"

श्रावणात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात.श्रावणी सोमवारी उपवास सोडायला अळूची वडी ही बनतेच.पण आवडीनुसार अळूच फदफदं ही बहुतेक घरांमध्ये बनवले जाते.. म्हणून आज मी पण बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन
  1. 3अळूची पाने
  2. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  3. 2 टेबलस्पूनचना डाळ
  4. 1हिरवी मिरची
  5. 4-5कडिपत्त्याची पाने
  6. 7-8 लसणाच्या पाकळ्या
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1/4 टीस्पूनजीरे
  10. 1/4 टीस्पूनमोहरी
  11. 1/4 टीस्पूनहळद, हिंग
  12. 1 टेबलस्पूनबेसन पीठ
  13. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  14. छोटासा गुळाचा खडा
  15. चवीनुसारमीठ
  16. 2 टेबलस्पूनतेल
  17. 2 टेबलस्पूनखोवलेला नारळ

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून कापून घ्या,देठ ही सोलून कापून घ्या..मी देठाचे छोटे दोन तुकडे घेतले आहेत.. आवडीनुसार जास्त ही घेऊ शकतो.. चना डाळ व शेंगदाणे एक तास आधीच भिजत ठेवा..

  2. 2

    डाळ आणि शेंगदाणे एका भांड्यात आणि कापलेली अळू दुसऱ्या भांड्यात असे कुकरला लावुन तीन शिट्या काढुन घ्या.

  3. 3

    कुकर होईपर्यंत फोडणीची तयारी करून घ्या.. सगळे जिन्नस एकत्र जमवून घ्या..

  4. 4

    शिजवलेली भाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्या.. कढईत बेसन पीठ भाजून घ्या..कलर बदली नाही करायचा फक्त पीठाचा कच्चेपणा दूर करायचा आहे.

  5. 5

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग चेचलेला लसूण कडिपत्ता लाल तिखट गरम मसाला हे सगळे जिन्नस परतून घ्या.चिंचेचा कोळ घाला भाजी घाला. डाळ, शेंगदाणे घाला.मीठ,गुळ घालून घ्या व त्यात एक ग्लास पाणी घालून मिडीयम गॅसवर दहा मिनिटे शिजू द्या.

  6. 6

    मस्त रटरट,फदफद आवाज येतो..भाजी शिजताना..तयार आहे गरमागरम भाजी.भाकरी, भातासोबत सर्व्ह करा

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes