अहाळीव ची खीर (ahaliv chi kheer recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#दुध
रेसिपी 2
अहाळीव हे एक अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. आयरन ,लोह , कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक अहाळीवांत आहेत. हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील ॲंटिऑक्‍सिडंट्‌स व रक्‍तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अहाळीव हे तरुणींसाठी उपयुक्‍त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.... अहाळीव व दुध हे असे कोम्बिनेशन आहे की जितके पौष्टिक तितकेच अती सेवन पण हानिकारक असते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास भिजायला आणी 10 मिनिट रेसिपी ला
4 सर्व्हिंग्ज
  1. 40 ग्रॅमअहाळीव
  2. 1/2 लीटरदुध
  3. 4 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनवेलची पूड
  5. 1 टीस्पूनपिस्ता सजावटीसाठी

कुकिंग सूचना

2 तास भिजायला आणी 10 मिनिट रेसिपी ला
  1. 1

    प्रथम अहाळीव दोन तासासाठी भिजत घाला(अर्धी वाटी अहाळीव असेल तर दिड वाटी पाणी घाला). भिजल्या नंतर ते फुलतात व चिक्कट होतात.सगळे सामानाची जुळवा जुळव करुन घ्या

  2. 2

    गैस वर दुध तापायला ठेवा एक उकळी आली की त्या मधे भिजलेली अहाळीव घाला व ढवळुन घ्या व तीन चार उकळी येऊ द्या

  3. 3

    आत्ता चवी प्रमाणे साखर घालुन एक दोन मिनिट उकळून घ्या व नंतर वेलची पूड घालून अजुन दोन तीन मिनिट उकळा म्हणजे खीर थोडी घट्ट येईल व नंतर गैस बन्द करुन पिस्ता नी सजवून गरम किंवा थंड सर्व्ह करावी अहाळीव ची खीर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes