अळूचं फदफद (alooch fadfad recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसिपीबुक #week5
पावसाळ्यात अळूच्या पानांचा नुसता बहर असतो.आणि अळू ची पान पौष्टिक असतात. आज मी अळूचे फदफद सांगणार आहेत.

अळूचं फदफद (alooch fadfad recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळ्यात अळूच्या पानांचा नुसता बहर असतो.आणि अळू ची पान पौष्टिक असतात. आज मी अळूचे फदफद सांगणार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटं
4 ते 5 व्यक्तींसाठी
  1. 4अळूची मोठी पानं
  2. 1 टीस्पूनबेसन पीठ
  3. 5ते 6 हिरवी मिरची
  4. कोथिंबीर
  5. 6ते 7 पाकळ्या लसूण
  6. 1/2 इंचआलं तुकडा
  7. 1/2 टीस्पूनलालतिखट
  8. 1/2 टीस्पूनतीळ
  9. 2 टीस्पूनचिंच गूळचे पाणी
  10. 1/2 टीस्पूनजिरं
  11. 1/2 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनकच्चे शेंगदाणे
  13. 1/2 टीस्पूनसुक्या खोबऱ्याचे पातळ काप
  14. 1/2 टीस्पूनहरभरा डाळ
  15. 2 टीस्पूनतेल
  16. 7-8 कडीपत्ता
  17. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटं
  1. 1

    शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि हरभऱ्याची डाळ 1/2तास भिजत theva.

  2. 2

    अळूच्या पानान ची देठे कट करून सोलून घ्या. पानांच्या जाड शिरा काडून टाका. सोललेली देठे आणि पानं बारीक कट करून घ्या.

  3. 3

    आता कुकरच्या एका डब्यात अळूची पानं देठं ठेऊन 1 कप पाणी आणि थोडं मीठ घाला. दुसऱ्या डब्यात भिजवलेले शेंगदाणे, खोबरं, डाळ आणि 1 कप पाणी घालून दोनीही कुकर मधे ठेऊन 2 शिट्या द्या.

  4. 4

    बेसन पीठ 3 टीस्पून पाण्यात कालवून ठेवा.

  5. 5

    कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची याची पेस्ट करा.

  6. 6

    कुकर गार झाल्यावर अळूची पानान मधे चिंच गुळाच पाणी आणि कालवलेले बेसनपीठ घालून रवीने घोटून घ्या. शेंगदाणे व डाळीतील पाणी काडून टाका.

  7. 7

    कढई मध्ये तेल तापल्यावर मोहरी, जिरं, कढीपत्ता घाला. मिरचीचे वाटण, हिंग आणि लाल तिखट घालून 1/2मिनिटं फिरवा.आणि मग शेंगदाणे, डाळ, खोबरं घालून 1 मिनिट परतून घ्या.

  8. 8

    आता अळूचे गरगटे त्यात घालून 2मिनिटं फिरवत राहा. मीठ व तीळ घाला. 3 ते 4 मिनिट उकळून गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रोजी

Similar Recipes