नारळीभात (narali bhaat recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा रेसिपी 2
नारळी पौर्णिमेचा नैवेद्य म्हणजे नारळीभात.कोकणात तांदूळ, काजू आणि नारळ यांचे भरपूर उत्पादन केले जाते.त्यामुळे नारळी भाताला विशेष मान आहे इथे. खूप खूप प्रकार आहेत यात.आजकाल साखर कमी खाल्ली जातेय म्हणून मी गूळ घालून आजचा नारळीभात केलाय. त्यामुळे त्याला मस्त गोल्डन रंग आलाय.
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा रेसिपी 2
नारळी पौर्णिमेचा नैवेद्य म्हणजे नारळीभात.कोकणात तांदूळ, काजू आणि नारळ यांचे भरपूर उत्पादन केले जाते.त्यामुळे नारळी भाताला विशेष मान आहे इथे. खूप खूप प्रकार आहेत यात.आजकाल साखर कमी खाल्ली जातेय म्हणून मी गूळ घालून आजचा नारळीभात केलाय. त्यामुळे त्याला मस्त गोल्डन रंग आलाय.
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप कोमट झाले कि त्यात 2 वेलची, अक्रोड आणि काजूबदामचे काप 1/2मिनिटं परतून घ्या.
- 2
गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात ओलं खोबरं 1 मिनिटं परतून घ्या.नंतर त्यात तांदूळ 2 मिनिटं परता.
- 3
आता नारळाचे पाणी, नारळाचे दूध, साधं दूध,अंदाजे पाणी घालून झाकण ठेवा.एक उकळी येउद्या.
- 4
आता त्यात मीठ, मिल्क मसाला आणि जायफळ वेलची पूड टाकून चमच्याने फिरवून कढईवर झाकण ठेवा.
- 5
भात निम्मा शिजला कि त्यात गूळ घालून फिरवा.पुन्हा त्यावर झाकण ठेवा.
- 6
गूळ किंवा साखर घातल्यामुळे तांदूळ शिजायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. तांदूळ शिजला नसेल तर साधं पाणी घाला.पाणी आटलं आणि तांदूळ शिजला कि गॅस बंद करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वादिष्ट नारळीभात (narali bhat recipe in marathi)
# सीकेपी#ckps सीकेपी लोकांची खासियत असलेला नारळीभात आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त आम्हा सीकेपी लोकांकडे केला जातो Pranjal Dighe -
कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi)
#shr#श्रावण_शेफ_week3#नारळीभात#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंजश्रावण महिना सुरू झाल्यावर सणांची रेलचेल असते. बरेच ठिकाणी गोडाधोडाचं जेवण खास करुन नैवेद्यासाठी बनवले जाते. श्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमा या सणाला विशेष करुन नारळी भात आणि नारळा पासून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. मी अगदी सहज सोपा कुकर मधे झटपट बनवता येईल असा स्वादिष्ट नारळी भात बनवला आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#week8#रेसिपीबुकरक्षाबंधन व नारळीपौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे दुसरी रेसिपी अर्थातच आहे "नारळीभात"! Archana Joshi -
नारळाच्या दुधातला नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णिमेच्या निमीत्ताने नारळी भात बनवल. नारळीपोर्णिमेला प्रत्येक घरोघरी बनवला जाणारा हा पदार्थ. Kirti Killedar -
-
नारळी भात (गूळ घालून) (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौणिमा विशेषनारळी पौर्णिमेला कोकणात हमखास बनवला जाणारा हा नारळी भात खूप छान लागतो.हा भात आपण साखर तसेच गूळ घालून पण बनवू शकतो. Deveshri Bagul -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज Sampada Shrungarpure -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमा श्रावणात एकापाठोपाठ येणारे सण त्यात एक नारळी पौर्णिमा कोळी बांधवांत नारळी पौर्णिमा ही अति उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी नारळाचे विविध पदार्थ बनविले जातात आणि नारळी भात हा तर प्रत्येक घरात हमखास बनतो,नारळी भात हा बासमती तांदूळ, गूळ, नारळाचे दूध यापासून बनविला जातो,ह्या भाताचा दरवळणारा घमघमाट आणि चव अतिशय रुचकर तर पाहुयात पारंपरिक गोडाचा पदार्थ नारळी भात बनविण्याची पाककृती. Shilpa Wani -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #पोस्ट1नारळी पौर्णिमा त्यात राखीपौर्णिमा चे औचित्य साधून नारळी भात हा पदार्थ आवश्य केला जातो . Arya Paradkar -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbr #आज रक्षाबंधन... नारळी पौर्णिमा... त्यामुळे अर्थातच ओल्या नारळाचा वापर करून पदार्थ बनविणे आले. त्यातही हेमा ताईंनी सांगितल्याप्रमाणे बनवायचा होता. म्हणून आज त्यांच्या रेसिपी प्रमाणे केलाय भात... अप्रतिम चवीचा झालाय नारळी भात... खूप खूप धन्यवाद... Varsha Ingole Bele -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज श्रावणी पौर्णिमा.आपली भारतीय संस्कृती उपखंडात दूरवर पसरली आहे. अनेकदा विशिष्ट तिथीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने सण साजरे केले जातात. अशीच नारळी पौर्णिमेची महती. पश्चिम किनारपट्टीवर मुख्यतः उत्तर कोकणात कोळी बांधव हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.श्रीफळ अर्थात नारळाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरवात इष्ट दैवताला श्रीफळ अर्पण करून केली जाते. पौर्णिमेला देवतुल्य सागराला श्रीफळ अर्पण करूनच नौका मासेमारीसाठी निघतात.या उत्सवाची लगबग काही दिवस आधीच बंदरात सुरू होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी किनाऱ्यावर ओढून ठेवलेल्या नौकांची डागडुजी केली जाते, आकर्षक रंग दिला जातो, मोटरचे तेल-इंधन भरले जाते.उत्सवाच्या दिवशीचा उत्साह तर काय वर्णावा! कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेशात, पारंपारिक संगीताच्या साथीने, सहकुटुंब, सागराची यथासांग पूजा करतात. सोन्याचा (वर्ख, रंग किंवा सोनेरी कागद लावलेला) नारळ सागराला अर्पण करून सागराला शांत होण्याची विनवणी केली जाते आणि मासेमारी उत्तम व सुरक्षित व्हावी म्हणून प्रार्थना करून नौका पुन्हा सागरात प्रवेश करत्या होतात.आमच्या वाडवळ समाजात देखील या दिवशी नारळाच्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. या सुमारास भाताच्या आवण्या (रोपण्या) आटोपलेल्या असतात. पाऊस श्रावण सरींनी बरसत असतो. गृहिणी पुन्हा स्वयंपाकघरातल्या आघाडीवर पदर खोचून सज्ज झालेल्या असतात. घरच्या ताज्या नारळाचे विविध पदार्थ गृहिणी आजच्या दिवशी बनवतात. त्यात नारळी भात आवर्जुन बनवला जातो. नारळ, घरचा तांदूळ, थोडासा सुका मेवा,आणि मोजके मसाल्याचे पदार्थ यांच्या पासुन स्वर्गीय चवीचा नारळीभात घराघरातून शिजतो. Ashwini Vaibhav Raut -
केशर युक्त नारळीभात (kesar naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीज्बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे."राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळापासून बनणाऱ्या वेगवेगळे पदार्थ नारळाच्या वड्या, नारळीभात असे विविध पदार्थ केले जातात. आज असाच CKP पारंपरिक पद्धतीने तयार केलेला नारळी भात कमी वेळात पटकन कसा करता येईल ते आपण पाहूया. Nilan Raje -
काजूतांदूळ खीर (kaju tandul kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज पोस्ट 1नारळी पौर्णिमा म्हंटलं कोकण समोर येतो आणि काजू, भात कोकणात भरपूर पिकतो. साध्य मी कोकणात असल्यामुळे काजूचे आणि तांदळाचे बरेच प्रकार मला खायला मिळाले. तिथलीच एक तांदळाची रेसिपी मी सांगणार आहेत. ती म्हणजे तांदळाची खीर. पण काजू आणि तांदळासोबत त्यात मी आणखी एक पदार्थ घातलाय त्यामुळे खिरीला आणखी छान टेस्ट आली आहे. Bhanu Bhosale-Ubale -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
कोकणातील पारंपारिक रस खापरोळी (ras khaproli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा १श्रावणातील पौर्णिमेचा दिवस महाराष्ट्रातील विविध भागात साजरा करण्यात येतो. ह्या दिवसाला नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन ह्या नावांनी संबोधले जाते. श्रावणी पौर्णिमेचा हा दिवस भारतात विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांकडून ‘नारळी पौर्णिमे’चा सण म्हणून साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नागपंचमीनंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसूचक मानलेले आहे. म्हणून ह्या दिवशी नारळापासून बनवलेल्या गोड पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते. आज मी आमच्या कोकणातील पारंपारिक खापरोळीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीजआज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात केला. खूपच छान झाला. Deepa Gad -
चवाचे घावणे (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8कोकणात तांदूळ,गूळ आणि नारळ यापासून अगणित पदार्थ बनवले जातात.त्यातलाच एक विशेष म्हणजे चवाचे घावणे.चव म्हणजे नारळ गुळाचे सारण.ते मसाला दोशाप्रमाणे घवणाच्या आत भरून गुंडाळी केली जाते. देशी रोलच म्हणानात.'बच्चे तो बच्चे, बाप रे बाप' म्हणजे लहान आणि मोठे सगळ्यांनाच हे चवाचे घावणे खूप आवडतात.नारळी पौर्णिमेला सकाळी नाश्त्याला हा प्रकार माझ्याकडे असतोच, कारण माझया अहोंचाही हा आवडता प्रकार आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
पपईचा हलवा (papaicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपी 2 Varsha Pandit -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे - नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन मासेमारीला परत सुरूवात होते. आणि नैवेद्य म्हणून देवाला नारळी भात दाखवला जातो.#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि पहिली पाककृती पोस्ट करत आहे. :) सुप्रिया घुडे -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबूक # week ८ नारळी पौर्णिमामला सख्खा भाऊ नसला तरी माझ्या प्रेमळ बहिणीसाठी मी दरवर्षी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित नारळीभात बनवत असते. मग मऊ मऊ, गरमागरम, स्वादिष्ट भात खाऊनच सण साजरा होतो. Radhika Gaikwad -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाच्या रेसिपीनारळाच्या रेसिपी म्हटलं की समोर पहील्यांदा आठवण येते ती नारळी भाताची. राखी पौर्णिमा आणि नारळी पोर्णिमा एकाच दिवशी असल्याने नारळी भाताची गोड मेजवानी ही सर्वांना मिळते. Supriya Devkar -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळी पौर्णिमानारळी पौर्णिमेचा नैवेद्य नारळी भाताशिवाय पूर्णच होत नाही. आज मीही नैवेद्य म्हणून गुळ घालून केलेला नारळी भात देवाला दाखवला. तशा तर नारळी भाताच्या अनेक रेसिपीज आहेत, मी केलेली रेसिपी थोडी वेगळी कारण यात मी गुळा बरोबर थोडी ब्राऊन शुगर वापरली त्यामुळे रंग आणि चव छान आली.Pradnya Purandare
-
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
नारळीपोर्णिमेनिमित्ताने आणि होणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे ‘नारळीभात’. माझ्या माहेरी आजी आणि आईकडून मिळालेला वारसा. हा भात शिजताना सुटणारा मोहक दरवळ मनाला पार बालपणीच्या आठवणींजवळ घेऊन जातो Bhawana Joshi -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#ckps#सौ. स्मिता कारखानीस##कुकपॅड रेसिपीज##श्रावण स्पेशल##नारळी भात# smita karkhanis -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbrमाझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍 Charusheela Prabhu -
केशरी नारळी भात (kesar narali bhat recipe in marathi)
#rbr #रक्षाबंधन हा सण आपण श्रावण महिने चां पौर्णिमेला साझरा केला झातो . आणि ह्या दिवस आपण नारळी पौर्णिमा महण तो आणि गोड मंजे घरो घरी नारळ घालुन भात बनविला जातो , म चला मी तोज नारळी भात मी बनवून दाखवते. Varsha S M -
नारळी भात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा......मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा !... श्रावण पौर्णिमा हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.नारळी भात हा पारंपारिक पदार्थ विशेष करून राखी पोर्णिमा किंवा नारळी पोर्णिमा निमित्त बनविला जातो. Priyanka Sudesh -
नारळीभात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#नारळीपौर्णिमा#वीक8लहानपणा पासूनच आवडीचा भात म्हणजे नारळीभात. खूप सुंदर होतो आणि पटकन होतो. Manali Jambhulkar -
नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात. Sudha Kunkalienkar
More Recipes
टिप्पण्या