कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#shr
#श्रावण_शेफ_week3
#नारळीभात
#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज
श्रावण महिना सुरू झाल्यावर सणांची रेलचेल असते. बरेच ठिकाणी गोडाधोडाचं जेवण खास करुन नैवेद्यासाठी बनवले जाते. श्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमा या सणाला विशेष करुन नारळी भात आणि नारळा पासून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. मी अगदी सहज सोपा कुकर मधे झटपट बनवता येईल असा स्वादिष्ट नारळी भात बनवला आहे. याची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 2 वाट्याबासमती तांदूळ किंवा कोणताही तांदूळ चालेल
  2. 2 वाट्याबारीक चिरलेला गुळ
  3. 2 वाट्याओलं खोबरं
  4. 2 टेबलस्पूनसाखर
  5. 2 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  7. 2 टीस्पूनकाजू
  8. 4हिरव्या वेलची
  9. 8लवंगा
  10. तांदळाच्या अडीच पटीने पाणी

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    नारळी भात बनवताना बासमती तांदूळ जुने असतील तर ते धुवून पाणी काढून १५ मिनिटे ठेवावे. जर कोलम किंवा इतर तांदूळ वापरले तर लगेचच धुवून वापरावे. काजूचे तुकडे करुन घ्यावे. लवंग काढून ठेवावी. नारळ खवणून त्याचं पांढरं खोबरं घ्यावे. गुळ बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    कुकर मधे २ टेबलस्पून तूप घालून त्यात फोडणी साठी लवंग आणि काजूचे तुकडे घालून ब्राऊन होईपर्यंत परतावे. मग त्यात धुतलेले तांदूळ घालून अलगद परतावे, म्हणजे तांदूळ मोडणार नाही.

  3. 3

    तांदूळ परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला गुळ आणि खवणलेलं ओलं पांढरं खोबरं, थोडी साखर घालून, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करुन त्यात तांदळाच्या अडीच पटीने पाणी घालून उकळी आल्यानंतर मगच कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढून भात शिजवून घ्यावा. कुकर उघडल्यानंतर अलगदपणे भात मिक्स करावा. खूप चविष्ट असा नारळी भात तयार होतो.

  4. 4

    एका वाटीला आतून तुप लावून त्यात नारळी भात दाबून बसवावा आणि मग एका प्लेटमधे वाटी उलटी करुन नारळी भाताची मूद काढून देवाला नैवेद्य अर्पण करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes