कढीगोळा (kadhi gola recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

कढीगोळा ! नावावरुनच अंदाज आला असेल आज कोणती रेसिपी आहे तर...मंडळी , विदर्भात हे कढीगोळे बहुधा प्रत्येक घरी बनविल्या जातात. आता सर्व भाज्या सर्व सिझनमध्ये ! मिळतात . परंतू पूर्वी भाज्यांची वानवा असायची. मग घरी असलेल्या जिन्नसातूनच भाज्या व्हायच्या. तर असाच हा प्रकार आहे. तूम्हाला नक्की आवडेल....

कढीगोळा (kadhi gola recipe in marathi)

कढीगोळा ! नावावरुनच अंदाज आला असेल आज कोणती रेसिपी आहे तर...मंडळी , विदर्भात हे कढीगोळे बहुधा प्रत्येक घरी बनविल्या जातात. आता सर्व भाज्या सर्व सिझनमध्ये ! मिळतात . परंतू पूर्वी भाज्यांची वानवा असायची. मग घरी असलेल्या जिन्नसातूनच भाज्या व्हायच्या. तर असाच हा प्रकार आहे. तूम्हाला नक्की आवडेल....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 2/3मेझरींग कप तुरीची डाळ
  2. 1/2 लिटरदही कढीसाठी
  3. 7-8हिरव्या मिरच्या
  4. 5-6लसूणाच्या कळ्या
  5. 1/2 इंचआले
  6. थोडासाकढीलिंब
  7. थोडी कोथिंबीर
  8. 2 टेबलस्पूनबेसन कढीसाठी
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टीस्पूनजिरेमोहरी
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. आवश्यकतेनुसार मीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम डाळ धुवून रात्रभर भिजत घालायची. दुसऱ्या दिवशी उपसून पाणी काढून थोडी सुकवायची. त्यानंतर मिरची कढीलिंब, आले, लसूण, कोथिंबीर, जिरे हळद, आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.

  2. 2

    छान बारीक झाल्यावर एका भांड्यात काढून घेवून त्यात एक टीस्पून साधे तेल टाकून मिक्स करुन घ्यावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवावे.

  3. 3

    दुसरीकडे कढी फोडणी द्यावी. कढी उकळायला लागली की त्यात एक एक करुन गोळे सोडावेत.ते गोळे शिजल्यावर वर येतात. तरी सुद्धा खाञी करण्यासाठी एखादा गोळ्यात चमचा टाकून बघावा. चमचा जर न चिकटता निघाला तर गोळे शिजले असे समजावे. साधारणपणे 7-10 मिनिटांत गोळे शिजतात. आता त्यात वरुन कोथिंबीर घालावी. अशाप्रकारे कढीगोळे तयार झालेत जेवणासाठी.

  4. 4

    हे कढीगोळे भाकरीसोबत खूप छान लागतात. आता हे खाण्याचेही दोन प्रकार आहेत. एकतर कढीमध्ये गोळा फोडून, त्यात वरुन तेल घेवून, सोबत वाळला कांदा घेवून भाकरी/ पोळीसोबत खायचे. दुसरे गोळा वेगळा फोडून, त्यात बारीक चिरलेला वाळला कांदा व तेल टाकून खायचे. कढी वेगळी घ्यायची. दोन्ही पद्धतीने छान लागतात कढीगोळे !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes