मुग बीन स्प्राऊट्स (mung beans sprouts recipe in marathi)_

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

 मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात. 

मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात
मुग बिन मोड कसे आणायचे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, आज मी मुंग बीन ला लांब मोड कसे आणायचे ती मेथड शेअर करणार आहे. हे स्प्राऊटस तुम्ही भरपूर रेसिपीज मध्ये वापरू शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपमूग
  2. आवश्यकतेनुसार पाणी
  3. झाडे लावण्याचा पाॅट (कुंडी)
  4. फायबर चे नेट किंवा टिशू पेपर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मुग बिन साफ करून पाण्यामध्ये 12 ते 14 तास भिजत ठेवा

  2. 2

    मी स्प्राऊटस बनवण्यासाठी झाडे लावण्याचा पॉट वापरतो. त्याला मी खालच्या साईडला जास्त होईल करून ठेवलेले आहे, ज्यामुळे जास्त पाणी जमा होत नाही आणि जर टिशू पेपर वापरला तर तो खराब होत नाही. जर तुमच्याकडे पॉट नसेल तर तुम्ही त्या जागी एखादी मोठी प्लास्टिक बॉटल किंवा पाच किलो तेलाची कॅन सुद्धा वापरू शकता. मी वापरलेल्या पॉटाची साइज 12 इंच बाय 10 इंच आहे.

  3. 3

    त्यात खालच्या साईडला ठेवण्यासाठी मी ही प्लॅस्टिकच्या 2 नेट वापरतो.

  4. 4

    मुग बिन भिजल्यानंतर त्यातले पाणी गाळून घ्या आणि तयार केलेल्या पॉटमध्ये ते टाका. त्यावर वरतून एखाद्या कापडाने झाकून ठेवा. हा पॉट एका प्लेटमध्ये एक इंची उंच स्टॅन्ड ठेवून त्यावर ठेवा म्हणजे आपण जेव्हा पोट मध्ये पाणी टाकू तेव्हा उरलेले पाणी खाली गळून जाईल.

  5. 5

    आता आपल्याला या बिन ला दिवसातून कमीत कमी दोन वेळेस पाणी द्यायचे आहे पाणी देताना पॉट सिंक मध्ये धरा आणि बिन ला पाणी टाका थोडे पाणी नितरू द्या आणि परत प्लेटमध्ये ठेवा, असे कंटिन्यू पाच दिवस करायचे आहे. सहावा दिवस आपला हार्वेस्ट डे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मध्ये ही स्प्राऊटस युज करू शकता. जर तुम्हाला स्प्राऊटस च्या पानांचा कलर हिरवा हवा असेल तर त्यावर झाकण ठेवू नका झाकण ठेवल्यावर तो कलर थोडा येल्लो येतो मि झाकूनच स्प्राऊट्स तयार करतो.

  6. 6
  7. 7

    सहाव्या दिवशी स्प्राऊटस ला पॉट मधून बाहेर काढून घ्या, स्प्राऊटस वर मुगाच्या डाळीचे दोन भाग असतात ते काढून घ्या, हे स्प्राऊट्स आपण मातीशिवाय बनवलेले असल्यामुळे तुम्ही त्याच्या रुट्स देखील खाऊ शकतात,

  8. 8

    आता आपले मग बिन स्प्राऊटस तयार आहे, हे स्प्राऊटस तुम्ही एअर टाईट बॅग मध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. याला आपण भरपूर रेसिपीज मध्ये वापरू शकतो जसे सूप,नूडल्स, सलाड असे भरपूर ठिकाणी याचा वापर करू शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
रोजी
पुणे

Similar Recipes