चुनवड्या (chunvadya recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

दिवाळी झाली ! गोड-धोड खाऊन कंटाळा आला! अशावेळेस काहीतरी चमचमीत तोंडाला झोम्बाणारे जेवण जेवायची हुक्की येते! अशा वेळेस एखादी पारंपारिक रेसिपी बनवली, तर सगळ्यांनाच आवडते.. अशीच ही चुन वड्यांची भाजी! विदर्भात त्यातही वर्धा अमरावती भागाकडे ही भाजी केल्या जाते! चविष्ट आणि घरी असलेल्या पदार्थांपासून, जिभेचे चोचले पुरवणारी ही भाजी , सगळ्यांनाच आवडते! त्यासोबत गरमागरम पोळी किंवा भाकर, कांदा , टोमॅटो आणि लिंबू असले की जेवणाची मजा काही औरच....

चुनवड्या (chunvadya recipe in marathi)

दिवाळी झाली ! गोड-धोड खाऊन कंटाळा आला! अशावेळेस काहीतरी चमचमीत तोंडाला झोम्बाणारे जेवण जेवायची हुक्की येते! अशा वेळेस एखादी पारंपारिक रेसिपी बनवली, तर सगळ्यांनाच आवडते.. अशीच ही चुन वड्यांची भाजी! विदर्भात त्यातही वर्धा अमरावती भागाकडे ही भाजी केल्या जाते! चविष्ट आणि घरी असलेल्या पदार्थांपासून, जिभेचे चोचले पुरवणारी ही भाजी , सगळ्यांनाच आवडते! त्यासोबत गरमागरम पोळी किंवा भाकर, कांदा , टोमॅटो आणि लिंबू असले की जेवणाची मजा काही औरच....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1-1/2 वाटीचणाडाळ बेसन, वड्याकरीता
  2. 1/2 टीस्पूनहळद
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनधणे पावडर
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. चवीनुसारमीठ
  8. थोडीशी कोथिंबीर
  9. 4-5 टेबलस्पूनतेल रस्सा बनविण्यासाठी
  10. 1मोठा कांदा व 1 मोठा टोमॅटो ची पेस्ट
  11. 1 टीस्पूनजिरेमोहरी
  12. 3 टेबलस्पूनशेंगदाणे,फुटाणे,खोबरे,खसखस बारीक करून पावडर
  13. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  14. 1 टेबलस्पूनतिखट
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1टिस्पून धणे पावडर
  17. 1 टीस्पूनमसाला
  18. चवीनुसारमीठ
  19. कोथिंबीर
  20. 3 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम वड्यांसाठी बेसन भिजवुन घेऊ. बेसनात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर टाकून चांगले एकत्र करावे. त्यानंतर त्यात 1 टेबलस्पून तेल टाकून, नंतर पाणी टाकून थोडे कडक भिजवावे जेणेकरून त्याची पोळी लाटून वड्या पडतील. 5 मिनिट बाजूला ठेवावे.

  2. 2

    आता भाजीचा रस्सा करून घेऊ. त्यासाठी गॅस सुरू करून गॅसवर एक भांडे ठेवावे. त्यात तेल टाकून नंतर जीरे,मोहरी टाकावी. त्यानंतर,त्यात कांदा टोमॅटो,आले लसूण पेस्ट, शेंगदाणा फुटाणे पावडर,टाकून चांगले एकत्र करावे. सोनेरी रंगावर आल्यावर त्यात धणे पावडर, हळद, तिखट, मसाला, मीठ टाकून चांगले एकत्र करावे. त्यानंतर त्यात पाणी घालावे. व उकळू द्यावे.

  3. 3

    रस्सा उकळे पर्यंत आपण चुन वड्या तयार करून घेऊ. त्यासाठी भिजवलेल्या पिठाचे दोन गोळे करून घ्यावे. एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी जाडसर, आणि त्याची शंकर पाळयाप्रमाणे वड्या पाडून घ्याव्यात.

  4. 4

    तिकडे गॅस वरचा रस्सा उकळी आलेला असेल. रस्स्याला उकळी आल्यानंतरच तयार केलेल्या वड्या एकेक करून त्यात सोडाव्या. अशाप्रकारे दोन्ही पोळ्यांच्या वड्या पाडून रस्स्यामध्ये सोडाव्या.

  5. 5

    जेव्हा वड्या वर येतील,तेव्हा वड्या शिजल्या असे समजावे. एखादी वडी चमच्याने तोडून बघावे. सहज कापल्या गेली तर वडी शिजली आहे, असे समजून गॅस बंद करावा. वड्या शिजवताना कमी आचेवर शिजवाव्यात. तसेच या भाजीला रस्सा जास्त पाहिजे,कारण थंड झाल्यावर भाजीचा रस्सा घट्ट होतो. त्यामुळे सुरुवातीला जरी रस्सा पातळ वाटला, तरी नंतर तो घट्ट होतो! तर अशी हि भाजी शिजल्यानंतर, वरून कोथिंबीर पेरावी. आवडत असल्यास खोबऱ्याचा कीस ही टाकावा. आणि गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत जेवायला द्यावी.

  6. 6

    बघा, तुम्हाला आवडते की नाही ते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (3)

Similar Recipes