तिरंगा भोजन

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
मुंबई

#तिरंगा #पोस्ट2

जैन स्पेशल गट्टे का शाक (भाजी). गट्टे का shaak आम्ही पर्युषण मध्ये हमकास बनवतो. बेसन वापरून गट्टे बनवले जातात आणि gravy मध्ये दही वापरला जात. जेणेकरून ग्रेव्ही ला आंबट तिखट टेस्ट येईल

भात - रोज उपयोगात येणारा

सालासकट मुगाच्या डाळीचा ढोकळा - सासूचा उपवास असल्यामुळे, ती एकच तिने जेवते, गॅस होई नये म्हणून हेल्दी मूंग डाळ ढोकळा ती पसंत करते.

तिरंगा भोजन

#तिरंगा #पोस्ट2

जैन स्पेशल गट्टे का शाक (भाजी). गट्टे का shaak आम्ही पर्युषण मध्ये हमकास बनवतो. बेसन वापरून गट्टे बनवले जातात आणि gravy मध्ये दही वापरला जात. जेणेकरून ग्रेव्ही ला आंबट तिखट टेस्ट येईल

भात - रोज उपयोगात येणारा

सालासकट मुगाच्या डाळीचा ढोकळा - सासूचा उपवास असल्यामुळे, ती एकच तिने जेवते, गॅस होई नये म्हणून हेल्दी मूंग डाळ ढोकळा ती पसंत करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. गट्टासाठी:
  2. 1/2 कपबेसन
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 1 टेस्पूनतेल
  7. मीठ चवीनुसार
  8. ग्रेव्हीसाठी:
  9. 1 टेस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनहिंग
  11. 1/2 टीस्पूनमोहरी
  12. 2 चमचाकसुरी मेथी
  13. 1 टीस्पूनलाल तिखट
  14. 1/2 टीस्पूनहळद (हळद) पावडर
  15. 1/2 कपआंबट दही / दही (उबदार)
  16. मीठ चवीनुसार
  17. भातासाठी
  18. 1/2 कपतांदूळ
  19. 3-4 कपपाणी
  20. डाळ ढोकला साठी
  21. 1 कपस्प्लिट मूग डाळ
  22. 1/2 कपपाणी किंवा मूग डाळ पीसण्यासाठी आवश्यक असलेले
  23. 1 चमचाजिरे
  24. 10-15काळी मिरी
  25. 1 चमचेतेल
  26. 1 चमचेदही
  27. आवश्यकतेनुसार मीठ
  28. 1 चमचेईनो

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटे
  1. 1

    गट्टासाठी, सर्व साहित्य मिसळा आणि पाणी वापरून मऊ पिठ मळून घ्या. तयार पीठ समान बॉलमध्ये विभागून पातळ दांडाकृती (पेन्सिलपेक्षा थोडे जाड) रोल करा.

  2. 2

    मोठ्या पॅनमध्ये 3 कप पाणी उकळवा. जेव्हा हे उकळी येते तेव्हा हे रोल ठेवा आणि त्यांना 10-15 मिनिटे शिजू द्या.
    पाण्यातून रोल काढा आणि प्लेटमध्ये स्थानांतरित करा. बाकीचे पाणी ग्रेव्ही बनवण्यासाठी ठेवा. त्यांना 5-7 मिनीटे थंड होऊ द्या. एकावेळी एक रोल घ्या आणि समान भागामध्ये कट करा आणि बाजूला ठेवा (सुमारे 40 गट्टा असावे).

  3. 3

    ग्रेव्हीसाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. ते फोडले की त्यात १/२ कप पाणी आणि कोरडे मसाले घाला. पाणी उकळण्यास सुरवात झाली की, सर्व गट्टा ग्रेव्हीमध्ये घालून साधारण 4--5 मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावे. सर्व गट्टा शिजल्यावर (एक खाऊ शकतो आणि गट्टा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते तपासू शकतो), नंतर ग्रेव्ही मध्ये दही घाला आणि मिक्स करावे.

  4. 4

    भात बनविण्यासाठी
    एका पातेल्यात 3-4 कप पाणी गरम करा. त्यात धुतलेले तांदूळ घाला. आपल्या आवडीनुसार भात शिजवून घ्या.

  5. 5

    ढोकल्याचे पिठ बनविणे
    मूग डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
    धुतलेली मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवा. मग पाणी काढून टाका.
    भिजलेली मूग डाळ जिरे, मिरपूड, मीठ आणि १/२ कप पाणी घालून भरड पेस्ट करून घ्या.
    पेस्ट फार बारीक करू नका.
    तसेच पीठ जास्त जाड किंवा पातळ नसावे परंतु ढोकळाच्या पिठासारखे असावे.

  6. 6

    ढोकला बनवण्याची क्रिया
    एका मोठ्या भांड्यात सुमारे 2 ते 3 कप पाणी गरम करून उकळी येऊ द्या.
    थोड तेल गोल प्लेटल लावा.
    ढोकळा मिश्रणात दही आणि एनो घाला आणि चांगले मिक्स करावे.
    हे ताबडतोब ग्रीस प्लेटमध्ये घाला.
    प्लेट मोठ्या पॅनमध्ये ठेवा जिथे आधीच पाणी उकळण्यास प्रारंभ झाला असावा.
    भांड्यावर झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे किंवा ढोकळा होईपर्यंत वाफ काढावी. ढोकळाला थंड होऊ द्या आणि नंतर आपण ते प्लेटमधून काढू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
हर प्लाटर हीस शटर
रोजी
मुंबई
नमस्कार, मी दीपिका. माझा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला असून, लग्न मात्र गुज्जू जैन मुलाशी केले. मी एचआर कर्मचारी म्हणून काम करत होते. मी आणि माझे पती खूपच खवय्ये आहोत. डिलिव्हरी नंतर मला जॉब सोडावा लागला. मी नेहमी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यावर खूप सारे पदार्थ खाल्ले, परंतु स्वतःहून ते तयार करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. अलीकडे लॉकडाउनमुळे, जेव्हा सर्व काही बंद होते. आम्ही आमचे क्रेविंगस पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा मी घरी अनेक रेसिपी करण्यास सुरुवात केली. आणि माझ्या नवऱ्याने मी जे जे बनवते त्याचे छायाचित्र टिपण्यास सुरवात केली .. म्हणून अशाप्रकारे आम्ही आमचा instapage सुद्दा तयार केले आहे ..
पुढे वाचा

Similar Recipes