भरली कारली (bharali karli recipe in marathi)

माधवी नाफडे देशपांडे
माधवी नाफडे देशपांडे @cook_25748619
बोरिवली पश्चिम

कारली ही भाजी कशीही केली तरी घरी आवडते. यावेळेस कोवळी कारली मिळाली त्यामुळे भरली कारली करण्याचा घाट घातला.

भरली कारली (bharali karli recipe in marathi)

कारली ही भाजी कशीही केली तरी घरी आवडते. यावेळेस कोवळी कारली मिळाली त्यामुळे भरली कारली करण्याचा घाट घातला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोकोवळी कारली
  2. 1/2 वाटीखवलेले ओले खोबरे
  3. 1/4 वाटीशेंगदाणा कूट
  4. थोडी कोथिंबीर
  5. 1/2 चिंच
  6. 2 चमचेगूळ
  7. आवडीप्रमाणेमीठ ,तिखट, गरम मसाला

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पहिल्यांदा कारली स्वच्छ धुवून पुसून घेतली. मग त्याचे गोल गोल तुकडे केले.. आणि त्यातल्या बिया काढून टाकल्या.

  2. 2

    मिक्सर क्या भांड्यात खोबरे, कोथिंबीर, दाण्याचे कूट, चिंच, मीठ, तिखट, गरम मसाला, गूळ सगळे घालून हलके एकत्र करून घेतले.

  3. 3

    हे मिश्रण प्रत्येक कारल्याच्या तुकड्यात भरून घेतले.

  4. 4

    Frypan मध्ये थोड्या जास्त तेलात फोडणी करून घेतली आणि त्यात ही कारली घालून झाकून ठेवली.

  5. 5

    थोड्या वेळाने सगळी भाजी छान परतून घेतली.. दोन्ही बाजू छान परतून घ्यायची.

  6. 6

    कारल्यात भरून उरलेल्या मसाल्यात किंचित पाणी घालून ते ह्या भाजीत मिक्स करून परत एक दणदणीत वाफ काढावी.

  7. 7

    ही भाजी साधे वरण भाता बरोबर एकदम झकास लागते..

  8. 8

    कारल्याची भाजी ही थोडी कडसर लागल्याशिवाय खाण्यात मज्जा नाही.. हो की नाही? 😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
माधवी नाफडे देशपांडे
रोजी
बोरिवली पश्चिम

टिप्पण्या

Similar Recipes