भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया ....

भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)

मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमकोवळी कारली
  2. 2मोठे पांढरे कांदे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनखोबरा किस मसाला करण्यासाठी
  5. 1 टेबलस्पूनडाळवा
  6. 1/2 टीस्पूनखसखस
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1 टेबलस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनतिखट
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1-1/2 टेबलस्पूनमीठ
  13. 1लहानसा गुळाचा खडा
  14. 1 टीस्पूनआमचूर
  15. 3 टेबलस्पूनतेल
  16. 9लसूण कळ्या
  17. आवश्यकतेनुसार पाणी
  18. 1/2 टीस्पूनजिरेमोहरी

कुकिंग सूचना

40 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम कारले धूवून घ्यावी. त्यांना 10 मिनीट मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवावी. नंतर पाण्यातून काढून त्याला मध्ये उभी चिर द्यावी. आणि त्यातील बिया काढून घ्याव्यात

  2. 2

    नंतर कारल्यांना आतून बाहेरून थोडेसे मीठ लावावे व किंचित पाणी घालून थोडेसे 5 मिनीट उकडून घ्यावेत.

  3. 3

    तोपर्यंत आवश्यक तो मसाला तयार घेऊ. डाळवा, खोबरा किस, शेंगदाणे, खसखस एकञ मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. तसेच एक एक कांदा वेगवेगळा बारीक करुन घ्यावा. व्हेजिटेबल कटर मध्ये एक कांदा आणि 4 लसूण कळ्या एकञ होईल तेवढे बारीक करुन घ्या. दुसरा कांदा हिरव्या मिरच्या आणि 5 लसूण कळ्या मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्या.

  4. 4

    आता जाडसर बारीक केलेल्या कांद्यात चवीनुसार तिखट मीठ किंचित हळद चिमूटभर धणेपूड व गरम मसाला तसेच थोडे आमचूर आणि थोडा गुळ आणि थोडी कोथिंबीर टाकून एकञ करुन घ्यावा. आता उकडून घेतलेले कारले काढून त्यात कांद्याचा तयार केलेला मसाला भरावा. म्हणजे मसाला भरलेली कारली तयार झालीय.

  5. 5

    आता कढई मध्ये तेल टाकून जिरेमोहरीची फोडणी द्यावी. नंतर मिक्सरमध्ये केलेली कांद्याची पेस्ट, तयार केलेला मसाला, हळद तिखट मीठ, धणेपूड, मसाला, उरलेले आमचूर आणि गुळ टाकून छान मिक्स करुन घ्यावे. आणि त्यात भरलेली कारली सरळ कापलेला भाग वर करुन, ठेवावीत. वरुन थोडी कोथिंबीर चिरुन घालावी व झाकण ठेवून शिजवावे 10 मिनीट. रस्सा हवा असल्यास किंचित पाणी टाकावे.

  6. 6

    त्यानंतर कारली हळूवारपणे परतवावी. म्हणजे आता दुसऱ्या बाजूने पण चांगली होतील. 5 मिनीट झाकण ठेवून.

  7. 7

    अशाप्रकारे भरलेली मसालेदार कारली तयार झाली. आता एका भांड्यात भाजी काढून घ्यावी. वरुन कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes