रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
१० लोक
  1. 2 आणि 1/2 वाटी साधा तांदूळ
  2. 1 वाटीचणाडाळ
  3. 1/2 वाटीउडीद डाळ
  4. 1/4 वाटीमुग डाळ
  5. 1 टेबलस्पूनमेथीचे दाणे
  6. चवीनुसार मीठ
  7. चिमुटभर सोडा
  8. 1 लिटरपाणी धुण्यासाठी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुऊन घ्या. पाणी टाकून भिजत घाला. आता याच प्रमाणे चणा डाळ,उडीद डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या भिजत घाला.तांदूळ भिजत घालताना त्यामध्ये मेथीचे दाणे पण ॲड करा. आता हे सर्व साधारण आठ तास भिजत ठेवणे.

  2. 2

    आता आठ तासानंतर प्रथम तांदूळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या,आणि एका पातेल्यामध्ये पेस्ट काढा आता याप्रमाणे चणाडाळ,उडीद डाळ आणि मुग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि तांदळाच्या पेस्टमध्ये हे मिश्रण ॲड करा. आता हे सर्व मिश्रण पाच मिनिट ढवळून घ्या आणि झाकण ठेवून नऊ तास फर्मेंट होण्यासाठी ठेवा.

  3. 3

    नऊ तास नंतर मिश्रण छान फर्मेंट झालेल असतं (छान फुगलेले असते). आता या मिश्रणामध्ये दोन टेबल स्पून मीठ आणि चिमूटभर सोडा ऍड करून हलक्या हाताने ढवळून घ्या आणि आप्पेपात्र मध्ये तेल लावून हे पीठ आप्पेपात्र मध्ये ऍड करा.

  4. 4

    आता हे आप्पेपात्र गॅस वरती ठेवून मध्यम आचेवरती दोन्ही साईड ने आप्पे छान भाजून घ्यावेत. खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे.

  5. 5

    छान जाळीदार आणि क्रिस्पी असे पौष्टिक आप्पे तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes