मका आणि भाताचे हेल्दी पॅनकेक (maka ani bhat pancake recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
मुंबई

#पॅनकेक

माझ्या 23 महिन्याच्या मुलाला रोज ब्रेकफास्ट मध्ये काय देऊ ह्याची चिंता असते. मी त्याला अजून जंक फुडची सवय लावलेली नाही. बिस्कीट किंवा ब्रेड नाही देत. साऊथ इंडियन डिशेस आणि वेगवेगळ्या प्रकारची पॅनकेक्स तो आवडीने खातो.
पॅनकेक्स/पुडला/चिल्ला ही एक वर्सटाईल डिश आहे, जी तुम्ही आपल्या आवडीनुसार बदल करून बनवू शकता. आणि ही बनवताना तेल ही खूप कमी लागतं आणि हव्या त्या भाज्या त्यात घालू शकता, आणि आपली मुलेही ती तक्रार न करता खातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपउकडलेले मक्याचे दाणे
  2. 1/4 कपशिजवलेला भात
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 इंचआल्याचा तुकडा
  5. 1 टेबलस्पूनबाजरीचे पीठ
  6. 2 टेबलस्पूनबेसन/चण्याच पिठ
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1/2 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    एका मिकसरच्या भांड्यात आधी मिरची व आले जाडसर वाटून घ्यावे. त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालून जाडसर वाटून घ्यावे.

  2. 2

    आता वाटलेले मिश्रण एका मिक्सिंग बाउल मध्ये काडा.
    वाटलेल्या मिश्रणात बाजरीचे पिठ, बेसन, भात व सगळे मसाले घालून मिश्रण चांगले मिक्स करा.

  3. 3

    मिश्रणात थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा. त्यात बारीक चिरलेली कोथींबीर घालुन चांगले मिक्स करा. तयार झाले मिश्रण 10-15 मिनिटे झाकून साइडला ठेवा.10-15 मिनिटानंतर त्यात दही घाला व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता एका तव्यात थोड तेल घालून, त्यात तयार मिश्रण घाला व पॅनकेक्स शलो फ्राय करून घ्या.थोडया वेळाने, पॅनकेक्स उलटून दुसर्ा बाजूने चांगले फ्राय करा.

  5. 5

    पॅनकेक्स आता तयार आहेत. गरम गरम पॅनकेक्स चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
हर प्लाटर हीस शटर
रोजी
मुंबई
नमस्कार, मी दीपिका. माझा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला असून, लग्न मात्र गुज्जू जैन मुलाशी केले. मी एचआर कर्मचारी म्हणून काम करत होते. मी आणि माझे पती खूपच खवय्ये आहोत. डिलिव्हरी नंतर मला जॉब सोडावा लागला. मी नेहमी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यावर खूप सारे पदार्थ खाल्ले, परंतु स्वतःहून ते तयार करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. अलीकडे लॉकडाउनमुळे, जेव्हा सर्व काही बंद होते. आम्ही आमचे क्रेविंगस पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा मी घरी अनेक रेसिपी करण्यास सुरुवात केली. आणि माझ्या नवऱ्याने मी जे जे बनवते त्याचे छायाचित्र टिपण्यास सुरवात केली .. म्हणून अशाप्रकारे आम्ही आमचा instapage सुद्दा तयार केले आहे ..
पुढे वाचा

Similar Recipes