रस्सम पावडर आणि रस्सम (rasam powder ani rasam recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#दक्षिण
आंध्र प्रदेश, कर्नाटक,तमिलनाडु, तेलंगाना
रस्सम ही साऊथ इंडियन डिश आहे रस्सम चवीला तिखट आंबटगोड असते. परंपरेनुसार रस्समचा बेस कोकम चिंच कैरी पासून बनवतात त्याचबरोबरीने गुळ लसूण काळी मिरी जिरे टोमॅटो डाळ आणि बाकीचे मसाले वापरतात.

रस्सम पावडर आणि रस्सम (rasam powder ani rasam recipe in marathi)

#दक्षिण
आंध्र प्रदेश, कर्नाटक,तमिलनाडु, तेलंगाना
रस्सम ही साऊथ इंडियन डिश आहे रस्सम चवीला तिखट आंबटगोड असते. परंपरेनुसार रस्समचा बेस कोकम चिंच कैरी पासून बनवतात त्याचबरोबरीने गुळ लसूण काळी मिरी जिरे टोमॅटो डाळ आणि बाकीचे मसाले वापरतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. रस्सम पावडरसाठी लागणारे साहित्य
  2. 1 टेबलस्पूनतूरडाळ
  3. 1 टेबलस्पूनजिरे
  4. 2 टेबलस्पूनकाळी मिरी
  5. 3 टेबलस्पूनधने
  6. 12-15सुकी लाल मिरची
  7. 1 टीस्पूनतेल
  8. 8-10कडीपत्ता पाने
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनहिंग तुकडे / हिंग
  11. रस्सम करण्यासाठी साहित्य
  12. 1-2 टेबलस्पूनरस्सम पावडर
  13. 1 कपचिरलेला टोमॅटो
  14. 1 टीस्पूनआलं बारीक चिरून
  15. 1-2 टीस्पूनलसूण
  16. चवीनुसारमीठ
  17. 3-4 कपपाणी
  18. 2 टीस्पूनचिंचेचा कोळ
  19. 1गूळ (ऑप्शनल)
  20. चिरलेली कोथिंबीर
  21. 1 टेबलस्पूनतेल
  22. 1/4 टीस्पूनमोहरी
  23. 1/4 टीस्पूनउडीद डाळ
  24. 1/4 टीस्पूनजिरे
  25. 3-4मेथी दाणे
  26. 1सुकी लाल मिरची
  27. 1हिरवी मिरची
  28. 3-4कडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पॅनमध्ये धने जिरे काळी मिरी लाल मिरची तूरडाळ घालून मध्यम आचेवर लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवावे

  2. 2

    त्याच पॅनमध्ये 1 टीस्पून तेल घालून कडीपत्ता परतावा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हळद हिंग घालून बारीक वाटून घ्यावे तयार झालेली रस्सम पावडर कोरड्या डब्यात काढून घ्यावी रस्सम करताना वापरावी.

  3. 3

    टोमॅटो मिरची कोथिंबीर आलं लसूण बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिरे मेथी दाणे उडीद डाळ कडीपत्ता मिरची आलं लसूण घालून परतावे.

  4. 4

    चिरलेला टोमॅटो मीठ आणि रस्सम पावडर घालून परतावे 2 मिनिटांनी पाणी घालून 10-15 मिनिटे उकळू द्यावे

  5. 5

    चिंचेचा कोळ आणि गुळ घालून 5 मिनिटे उकळू द्या आणि चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम रस्सम भाताबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes