स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल रेसिपी. फ्राईड मिल्क हा स्पॅनिश डेझर्ट चा प्रकार आहे. अंड वापरून किंवा एगलेस दोन्ही पद्धतीने हे बनवले जातात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे डेझर्ट बनते.

स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल रेसिपी. फ्राईड मिल्क हा स्पॅनिश डेझर्ट चा प्रकार आहे. अंड वापरून किंवा एगलेस दोन्ही पद्धतीने हे बनवले जातात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे डेझर्ट बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4 सर्व्हिंग्स
  1. 250 मिली दूध
  2. 1/4 कपकॉर्नफ्लोअर
  3. 1/4 कपपिठीसाखर
  4. 1 कपब्रेड क्रम्स
  5. 2 टेबल स्पूनमैदा
  6. 1 टिस्पूनदालचिनी पावडर

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    एका पॅनमध्ये पाव कप कॉर्नफ्लॉवर व पाव कप पिठीसाखर घ्या. व्यवस्थित मिक्स करून यामध्ये दूध घाला.

  2. 2

    सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून हा पॅन गॅसवर ठेवा. कॉर्नफ्लॉवर च्या गुठळ्या होऊ न देता मिश्रण सतत ढवळत रहा.

  3. 3

    हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्या. हे मिश्रण थोडेसे ट्रान्सपरंट दिसू लागले की ते तयार झाले असे समजावे. आता एका चौकोनी आकाराच्या डब्यामध्ये मिश्रण काढून फ्रिजमध्ये दोन तासासाठी ठेवून द्या. दोन तासानंतर डबा बाहेर काढून सेट झालेले मिश्रणाचे चौकोनी तुकडे करून घ्या

  4. 4

    एका भांड्यामध्ये दोन टेबल स्पून मैदा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून पातळसर पेस्ट बनवून घ्या.

  5. 5

    आता तयार झालेले चौकोनी तुकडे मैद्याच्या मिश्रणामध्ये बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

  6. 6

    तळलेल्या फ्राईड मिल्क वर दालचिनी पावडर भुरभुरून हे डेझर्ट सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes