बारबेक्यू स्टाइल केजुन पोटैटोज (cajun potato recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
मुंबई

#GA4 #week1
बारबेक्यू नेशन मध्ये गेल्यावर, हमकास आवडणारा पदार्थ, केजुन पोटैटोज. रेसिपी खूप सोप्पी आहे, छोट्या भुकेसाठी चांगला ऑप्शन आहे. आणि झटपट बनते सुद्धा.

बारबेक्यू स्टाइल केजुन पोटैटोज (cajun potato recipe in marathi)

#GA4 #week1
बारबेक्यू नेशन मध्ये गेल्यावर, हमकास आवडणारा पदार्थ, केजुन पोटैटोज. रेसिपी खूप सोप्पी आहे, छोट्या भुकेसाठी चांगला ऑप्शन आहे. आणि झटपट बनते सुद्धा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. केजुन मेयोनिज ड्रेसिंगसाठी:
  2. 4 टेबलस्पूनमेयोनिज
  3. 1 टीस्पूनलसूण पावडर
  4. 1 टीस्पूनकांदा पावडर
  5. 1/2 टीस्पूनवाळलेल्या ओरेगानो
  6. 1/2 टीस्पूनवाळलेल्या थाईम
  7. 1/2 टीस्पूनमिरपूड
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 2 टेबलस्पूनदूध
  10. 1 टीस्पूनटोमॅटो केचअप
  11. चवीनुसार मीठ
  12. क्रिस्पी पोटैटोज साठी:
  13. 10-12बेबी पोटैटोज
  14. चवीनुसार मीठ
  15. तळण्यासाठी तेल
  16. 2 चमचेहिरव्या कांद्याची पात बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कॅजुन मेयोनिज ड्रेसिंग बनविण्यासाठी:
    एका वाडग्यात मेयोनिज, टोमॅटो केचप आणि इतर नमूद केलेले सर्व मसाले एकत्र करा. बाजूला ठेवा. जर ड्रेसिंग खूप जाड असेल तर आपण 1-2 चमचे दूध घालू शकता. मी सहसा योग्य कंसिटेंसी मिळविण्यासाठी दूध घालते.

  2. 2

    क्रिस्पी पोटैटोज तयार करण्यासाठी:
    बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
    बटाटे उकडवून घ्यावी, पूर्ण शिजवू नका. (90% शिजवा)
    शेवटी पाणी काढून टाका आणि बटाटे थंड होऊ द्या.

  3. 3

    आता एक एक बटाटा घेऊन चोपींग बोर्ड किंवा प्लेट मध्ये ठेवून, चमचा किंवा आपल्या तळहाताच्या सहाय्याने प्रत्येक बेबी पोटैटोज दाबून घ्या, जोपर्यंत त्वचा फक्त फुटत नाही. (तुटू देऊ नका).

  4. 4

    एका पॅनमध्ये मध्यम आचेवर थोडे तेल गरम करावे आणि बेबी पोटैटोज कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या.
    बटाटे कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी झाल्यावर ते प्लेटवर काडा.

  5. 5

    सर्व्हिंग प्लेटवर क्रिस्पी पोटैटोज घाला. तयार कॅजुन मेयोनिज ड्रेसिंग प्रत्येक बटाटावर घाला, त्यावर बारीक चिरलेली हिरव्या कांद्याची पात घालून त्वरित सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
हर प्लाटर हीस शटर
रोजी
मुंबई
नमस्कार, मी दीपिका. माझा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला असून, लग्न मात्र गुज्जू जैन मुलाशी केले. मी एचआर कर्मचारी म्हणून काम करत होते. मी आणि माझे पती खूपच खवय्ये आहोत. डिलिव्हरी नंतर मला जॉब सोडावा लागला. मी नेहमी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यावर खूप सारे पदार्थ खाल्ले, परंतु स्वतःहून ते तयार करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. अलीकडे लॉकडाउनमुळे, जेव्हा सर्व काही बंद होते. आम्ही आमचे क्रेविंगस पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा मी घरी अनेक रेसिपी करण्यास सुरुवात केली. आणि माझ्या नवऱ्याने मी जे जे बनवते त्याचे छायाचित्र टिपण्यास सुरवात केली .. म्हणून अशाप्रकारे आम्ही आमचा instapage सुद्दा तयार केले आहे ..
पुढे वाचा

Similar Recipes