आळूवडी (aluvadi recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week14
#आळूवडी गणपती उत्सव झाला की पित्तरपाटा सुरु होतो पुर्वजाना जेऊ घातले जात असते तेव्हा अनेक प्रकार बनवले जातात त्या पैकी एक हा पदार्थ आहे आवजुन केला जातो नैवेद्य च्या ताटात अळुवडी विशेष महत्त्व दिले जाते तसेच नागपंचमीला देखील उकडी चे पदार्थ बनतात तेव्हा हे बनवले जातातच माझ्या घरी तळलेली व फोडणीचे आळुवडी असते (टिप आळूचे पान हे काळ्या देठाचे आणावे ते कधीच खवखवत नाही )

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 10-12आळूचे पान
  2. 250 ग्रॅमबेसन पीठ
  3. 2 टीस्पूनबडीशेप
  4. 2 टीस्पूनतिळ
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनजीरे पावडर
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 2 टीस्पूनअललसुण पेस्ट
  9. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  10. 200 ग्रॅमगुळ
  11. 50 ग्रॅमचिंच

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    आळूचे पान स्वच्छ् धुऊन घ्या आणि त्या चे डेठ काढुन ते लाटन्याच्या साहाय्याने लाटुन घेतली की वडी फाटत नाही

  2. 2

    चिंच गूळ पाणी घालून भिजत ठेवून त्यात मीठ हळद जिरे पावडर धन्याची पूड तीळ बडीशोप अललसुण पेस्ट मिरची पावडर एकत्र करून त्यात बेसन पीठ भिजवून घेतले

  3. 3

    आळूचे पान उलटे ठेवून त्यावर बनवलेले पीठ दाखवलेल्या प्रमाणे लावून एका वर एक थर देऊन तो रोल करावा

  4. 4

    तयार केलेला रोल ईडली पाञात 20मि वाफवून घ्यावी व नंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले

  5. 5

    तेल गरम करून त्यात ते खरपुस तळून घ्यावेत नाही तर खमंग ची फोडणी तयार करून घालावी वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

Similar Recipes