अळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)

संक्रांतीचा काळ असल्यामुळे आणि खूप थंडी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिळ घातले तरी ते कुरकुरीत आणि चवीला छानच वाटतात आणि शरीरासाठी सुद्धा ते आवश्यक किंवा पोषक असतात हळूहळू करताना सुद्धा मी ज्याचा वापर केला आणि खरंच अतिशय सुंदर चव आली.
अळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
संक्रांतीचा काळ असल्यामुळे आणि खूप थंडी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिळ घातले तरी ते कुरकुरीत आणि चवीला छानच वाटतात आणि शरीरासाठी सुद्धा ते आवश्यक किंवा पोषक असतात हळूहळू करताना सुद्धा मी ज्याचा वापर केला आणि खरंच अतिशय सुंदर चव आली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आळूची पानं स्वच्छ धुवून,पुसुन, देठ काढून आणि अळूच्या पानाच्या पाठच्या बाजूला असलेले शिरा ठेचून घेऊन ठेवावित.
- 2
नंतर एका भांड्यात बेसन आणि बाकी सर्व साहित्य एकत्र करून जाडसर मिश्रण करून घ्यावे.
- 3
अळूची पानं पालथी,म्हणजे सुलट बाजू खाली ठेवून त्यावर बेसनाचा पातळ थर लावून एकावर एक अशी पाने ठेवून, दुमडून,घट्ट गोल रोल करून घ्यावा आणि इडलीच्या भांड्यात पाणी उकळून वाफ येत असताना सर्व रोल पंधरा मिनिटे वाफवून घ्यावेत.
- 4
अळूवडी वाफउन झाल्यानंतर थंड करावी आणि मग पातळ कापून पॅनवर फ्राय करताना त्यावर तीळ लावून फ्राय करावे ते कुरकुरीत होतात आणि चवही खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळुवडी हा पदार्थ सर्वांच्या अत्यंत आवडीचा प्रकार. अळू वडी ची पाने आकाराने मोठी, गर्द हिरव्या रंगाची आणि मोठ्या दांड्याची, थोडी जाड असतात. अळू वडी करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत पण आज मी तुम्हाला पारंपारिक ब्राह्मणी पद्धतीची अळू वडी रेसिपी सांगणार आहे. ज्यामध्ये काही घटक पदार्थांमुळे याला खूपच सुंदर चव येते. आमच्या घरी अळू वडी ही तळून खायला आवडते तिची कुरकुरीत चव सर्वांना खूप आवडते, अशा वेळी डाएट थोडा वेळ विसरावे लागते. घरी पूजा, गणपती, काही मंगल कार्य असेल तर या अळू वडी शिवाय जेवण पूर्ण होत नाही.Pradnya Purandare
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14खमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. पण त्यावेळेस काही जणांकडे अळूवडी मधे कांदा लसूण घालत नाहीत. पण कांदा लसूण न घालताही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी बनवली ती रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी हा बहुतेक सगळ्या मराठी लोकांचा आवडता पदार्थ आहे. वडीच्या अळूच्या पानांना पीठ सारवून उंडे वळून वाफवून घेतात. वाफवलेले उंड्यांच्या वड्या कापून तळतात किंवा तव्यावर तेल घालून भाजतात. ह्या वड्यांचे बारीक तुकडे करून खमंग फोडणीला टाकले आणि नारळ, कोथिंबीर घातली की छान चविष्ट भाजी सुद्धा होते. अळुवडीचं पीठ वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची अळूवडी - भाजणी, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घालून फारच चविष्ट लागते. Sudha Kunkalienkar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच Shital shete -
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#पश्चिम # महाराष्ट्र😋अळूवडी😋अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण,आणि वेळखाऊ असतात. करणाऱ्याचा दम काढणाऱ्या आणि त्यांच सर्व कसब पणाला लावणाऱ्या असतात. कारण अळूवड्या बनविताना त्यांची चव व्यवस्थित जमवावी लागते. वडीला आंबटगोड चव लागली नाही, तर अळूवडी 'ही अळूवडी लागतच नाहीत😊अळूवड्याच हे'अळूवडीपण' असतं पानांना लावले जाणारे मसाले , त्यात वापरले जाणारे जिन्नस, पिठाचे प्रमाण, पिठाचा घट्टपणा ह्यात ते जमलं की अळूवडी तुम्हाला जमलीच समजा.😋खमंग-कुरकुरीत अळूवडी तोंडात टाकल्यावर तिची जी आंबड-गोड चव जिभेवर रेंगाळते, तिचं वर्णन करायला शब्दही सापडत नाहीत. त्यासाठी अळूवडी बनवून एखादी अळूवडीच तोंडात टाकायला पाहिजे हा.(कधी घेताय मग बनवायला)😃कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात. Prajakta Patil -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #आळूवडीश्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. आळूवडी करता मोठी पान घ्यावीत. Anjali Muley Panse -
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 आळूवडीआणिबर्फीरेसिपीpost1कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच आवडते. पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यामधे अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठीवापरली जातात.तळताना अळूवडीच्या सुटत जाणा-या खमंग पदरासारख्या कितीतरी आठवणी ह्या एका मराठमोळ्या पदार्थांभोवती घुटमळतात. एकेका सुरेख आठवणींचे पदर हळूहळू उलगडत पार भुतकाळाची वारी घडवून आणतात. अळूवडीची पाने आता जरी सर्रास १२ महिने मिळत असली तरी पूर्वी जास्त करून पावसाळ्यात उपलब्धता असे. मस्त पावसाळ्यातील दिवस, हिरवाईच्या अनेक छटा ल्यालेली झाडे, धुंद वातावरण आणि खमंग शाकाहारी जेवणाचा बेत. गौरी-गणपतीत तर घरी हमखास अळूवडीचा बेत असतो. यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अळूची पाने (Taro Leaf). अळूच्या पानांपासून बनवलेल्या अळूवड्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे औषधी गुणधर्म असलेल्या या अळूच्या पानांपासून न केवळ अळूवडी बनवता येते तर आणखी खमंग, चटकदार चवदार अशा रेसिपीज बनविता येतात.अळूची पाने खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात आणता येते. त्याचबरोबर पोटाचे विकार, सांधेदुखी यांसारखे आजारही बरे होण्यास मदत होते. त्यामुळे अळूची पाने खाताना जर तुमची नाकं मुरडत असतील तर तुम्ही ही आळूवडीची रेसिपीज ट्राय करुन त्यावर ताव मारू शकता. Nilan Raje -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी .... जेवणाच्या पानात असली की संपुर्ण जेवणाला खमंग चव येते. बरोबर ना...आता Shubhangee Kumbhar -
नारळाच्या दुधातली लुसलुशीत अळूवडी (naralachya dudhatil aloo vadi recipe in marathi)
#फ्राईड Mrudul Prabhudesai -
नारळाच्या शिरातली / दुधातील अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14प्राणी, पक्षी, फळे, फुले यांचे जसे राजे मानले जातात तसे वडी पदार्थांची राणी म्हणजे अळूवडी मानली जाईल. त्यातही 'नारळाच्या दुधातली अळूवडी' म्हणजे जणू सिंहासनावर बसलेली महाराणीच. अळूचा जन्म कंदमुळाच्या वंशातील आहे. वडीच्या अळूच्या पाठीवर, भाजीचा अळू आणि शोभेचा अळू अशी आणखी दोन भावंडे. पण जेष्ठतेनुसार राजगादी वडीच्या अळूकडे आली आहे. अळूवडीने त्या गादीचा मान सर्वतोपरी राखला आहे. आग्नेय आशियातील आपले साम्राज्य विस्तारत आता जवळपास संपुर्ण आशिया व आफ्रिकेच्या बहुतांश भागात पसरले आहे. अर्थात या साम्राज्य विस्तारात अळूवडीला मानणारी प्रजा, म्हणजे घरोघरीच्या गृहिणींचा मोठा वाटा आहे. पिढी-दर-पिढी या रेसिपी घराघरांतून जपल्या गेल्या आहेत.प्रत्येक पदार्थाची एक ओळख, एक डिग्निटी असते. अळूवडीच्या बाबतीत या डिग्निटीला धक्का लावण्याचा प्रयत्न काही दुकानांमधून होतो. अनेकदा काही ढोकळा, जिलेबी, समोसा विकणाऱ्या दुकानांतून अळूवडी सदृष्य पदार्थ विकला जातो. पारंपारिक पद्धतीने बनविलेली अळूवडी ही खरी चलनी नोट मानली तर या दुकानांतून मिळणारी अळूवडी म्हणजे 'भारतीय बच्चोका बँक' या नावाने मिळणाऱ्या खेळण्यातील नोटांसारखी असते. अळूवडीची डिग्निटी सांभाळायची, तिचा आब राखायचा तर ती पारंपारिक पद्धतीने बनवून, एखाद्या खास जेवणाच्या ताटात विराजमान व्हायला हवी. आपल्याला लक्षात ठेवायला हवे, ती महाराणी आहे!अळूची पाने बाराही महिने उपलब्ध असतात. भाजीचा अळू वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने भाजी म्हणून खाल्ला जातो. अळूच्या कंदाला उपवासाच्या पदार्थांत मान आहे. पण खरी सेलिब्रिटी असते ती अर्थातच आपली अळूवडी. नारळाच्या दुधाच्या राज्यासनावर विराजमान झालेली समस्त वड्यांची महाराणी 'अळूवडी'! Ashwini Vaibhav Raut -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणि बर्फीमाझी आवडता पदार्थ माझ्या माहेरी आणि सासरी थोडी वेगळी पद्धतीने बनवली जाते. मी आज आईच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. छान झाली. Veena Suki Bobhate -
कोकोनट अळूवडी (coconut aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीमी आज आपल्या कूकपॅडवरची मैत्रीण प्राजक्ता पाटील हिची अळूवडीची रेसिपी जी मी बरेच दिवस शोधत होती ती खोबऱ्याची अळूवडी म्हणजेच ओले खोबरे घालून केलेली अळूवडी केली, अफलातून चव, या अळूवड्या जास्त कुरकुरीत नाही होत कारण त्यात खोबरे व दालचिनी, लवंग, खसखस हे मसाले घालून वाटण केलेले बेसनमध्ये घातले आहे. तुम्हीही करून बघा, मस्तच झालीय.... मला तर खूपच आवडली. Deepa Gad -
आळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
पावसाळ्यात अळूची पानं अतिशय सुंदर मिळतात त्याची वडी खूप खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे. Arya Paradkar -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 खुसखुशीत आंबट-गोड चव असलेली आळुवडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढते. म्हणूनच आंबट गोड अशा खुसखुशीत अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
अळूवडी प्रकार - 2 (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#मका पीठ#तांदूळ पीठ Sampada Shrungarpure -
-
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 14 अळूवडी आणि बर्फी लहानपणापासून अळूवडी माजी सगळ्यात आवडती डिश आहे. आज ही ती आवड काही कमी झालेली नाही Swara Chavan -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#आळूवडीआणिबर्फीअळूच्या पानामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात. अळूच्या पानात असणारे योग्य प्रमाणात कॅल्शियम तुमची हाडे मजबूत ठेवतात. डोळ्याच्या प्रत्येक समस्या वर अळूची वडी लाभदायी आहे. तसेच ज्यांना मधुमेह आजार आहे त्यांनी अळूवडी खाल्ल्याने फायदा होतो. साखर नियंत्रणात राहते. प्रोटीनचा उत्तम घटक म्हणून आळूवडी खाली. पण ज्यांना यूरिक ॲसिड चा त्रास जास्त आहे, अशांनी कमी खावी. आळूला नैसर्गिक रित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि साफ करणे आवश्यक आहे. तसेच अपुरा शिजवल्यास लूज मोशन चा त्रास होऊ शकतो. म्हणून शिजवताना तो नीट शिजवून घ्यावा...काळसर देठाची आळु ही अळू वडी साठी वापरली जातात.... आणि हिरवट देठाची पाने आळुच्या भाजीसाठी वापरली जातात, आळूवडी साठी पाने घ्याल, तेव्हा ती पाने एकसारखे, थोडीफार एका आकाराची असलेली घ्याल. त्यामुळे रोल चांगला होतो व एकसारख्या वड्या पाडता येतात. मला आळूची पाने व्यवस्थित न मिळाल्यामुळे लहान मोठ्या वड्या कराव्या लागल्या.. पण छान कुरकुरीत झाल्यात.... 💕💃🏻💕💃🏻 Vasudha Gudhe -
अळूचं फदफदं (aluch fadfand recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशल_रेसिपी_चॅलेंज" अळूचं फदफदं " अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. भरपूर सारे पौष्टिक तत्व जसे व्हिटॅमिन -सी , मॅग्नेशियम, आयर्न,झिंक आणीब फायबर ने परिपूर्ण असलेली अळूची भाजी किंवा फदफदं एकदा तरी प्रत्येकाच्या घरी बनतेच...😊😊बाराही महिने मिळणाऱ्या या भाजीची श्रावणात विशेष करून पावसाळ्यात चव जरा जास्तच अप्रतिम लागते....👌👌 Shital Siddhesh Raut -
संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#LCM1संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी प्रत्येक ऋतूसाठी असे काही सण दिलेले आहेत की ज्यामुळे उत्साह वाढतो. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यात तीळातुन उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात. Anushri Pai -
-
-
सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी अळूवडी सर्वांची अतिशय आवडीची...पण अळूवडी म्हटले कि अगदी सुगरणीचेच काम ..पण मला तर वाटतं की अळूवडी करणे खूप सोपे आहे..वरवर जरी कठीण वाटत असले तरी ...फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अळूवडी करणे एकदम सोपे..एकतर अळूची पाने फार जुन नको.दुसरे म्हणजे dark brown कलरचे देठ असलेले पाने घ्यायची.आणि वडी तळल्यावर कुरकुरित लागली पाहिजे.चला तर मग बघुया सात्विक अळूवडी ची रेसिपी... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या