कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

#कटलेट #सप्टेंबर

कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० तास
२ सर्विंग
  1. 1 वाटीकॉर्न (उकडलेले)
  2. 2बटाटे (उकडलेले)
  3. 1कांदा (चिरून)
  4. 1शिमला मिरची (चिरून)
  5. 4-5हिरवी मिरची (बारीक चिरून)
  6. 1 इंचआल्याचा तुकडा (पेस्ट)
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  11. चवीनुसार मीठ
  12. 1/4 वाटीब्रेड क्रम्स (ब्रेड ला मिक्सर मधून बारीक करून)
  13. 1 टेबलस्पूनबेसन (भाजून घ्यावे)
  14. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  15. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  16. 2 टेबलस्पूनशिजवलेले कॉर्न (दाणे)
  17. 1 टीस्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

३० तास
  1. 1

    प्रथम मिक्सर मधून शिजवलेले कॉर्न बारीक वाटून घ्यावे.थोडे जाडसरच वाटावे.एक मोठ्या डिश मध्ये...कॉर्न पेस्ट,बटाटे शिजवलेले सोलून किसून घ्या,कांदा, हिरवी मिरची,शिमला मिरची,आले, कोथिंबीर,हळद, लाल तिखट,गरम मसाला,चाट मसाला, चवी पुरते मीठ घालुन छान मिक्स करून घ्यावे,आता त्या मध्ये ब्रेड क्रूंब,बेसन,कॉर्न फ्लोर, काळी मिरी क्रश,शिजवलेले कॉर्न दाणे आणि लीबु रस घालून छान एकजीव करावे.

  2. 2

    तयार मिश्रण चे बुलेट शेप सारखा आकार मी दिला आहे..एक प्लेट मध्ये ठेवा. डीप फ्राय करण्या साठी तयार आहेत...

  3. 3

    कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे (डीप फ्राय साठी)तेल गरम झाले की तयार कटलेट एक एक सोडत,मध्ये मध्ये हलवून घ्या, छान गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्यावेत.खायला तयार आहेत आपले..

  4. 4

    .कॉर्न कटलेट.. सॉस सोबत, हिरवी चटणी सोबत खायला तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes