बटाटे पोहे (batata pohe recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

महाराष्ट्राची शान म्हणायला हरकत नाही..नाही का..पोहे म्हणजे अगदी सगळ्यांच्या घरी केला जाणारा पदार्थ...पण आज माझ्या घरी कसा केला जातो..हे शेअर केले आहे आज तुमच्या सोबत...आवडेल तर नक्की सांगा..

बटाटे पोहे (batata pohe recipe in marathi)

महाराष्ट्राची शान म्हणायला हरकत नाही..नाही का..पोहे म्हणजे अगदी सगळ्यांच्या घरी केला जाणारा पदार्थ...पण आज माझ्या घरी कसा केला जातो..हे शेअर केले आहे आज तुमच्या सोबत...आवडेल तर नक्की सांगा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३ सर्विंग
  1. 3 वाटीपोहे
  2. 2मोठे बटाटे
  3. 1मोठा कांदा
  4. 4-5हिरवी मिरची
  5. 6-7कढीपत्ता
  6. 3 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 टीस्पूनराई
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. 1लिंबू
  11. 1 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम गॅस वर एक कढई तापत ठेवा,त्यामध्ये तेल घालून घ्या,तेल गरम झाले की राई घालून घ्या,राई तडतडली की त्या मध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची,कांदा घालून छान परतून घ्या,कांदा थोडा परतायला की बारीक क्यूब मध्ये कापलेले बटाटे घालून घ्या,चांगले परतून झाले की त्या वर झाकण ठेवून वाफ काढून घ्या.

  2. 2

    पोहे चाळण मध्ये घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या,चाळण निथळत ठेवा.

  3. 3

    ३-४ मिनिटांनी झाकण काढून परतून घ्या, बटाटे शिजले आहेत का बघून घ्या,जर शिजले नसतील तर पुन्हा २ मिनिटे झाकण लावून ठेवा,बटाटे शिजले की त्या मध्ये हळद, चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्या,धुतलेले पोहे घालून मिक्स करावे.पाण्याचा हापकरा घालून झाकण लावून २ मिनिटे वाफ काढावी.२ मिनिटे झाली की झाकण काढून.. कोथिंबीर पेरावी, लिंबू पिळून घ्या.छान मिक्स करून घ्या.

  4. 4

    गरम गरम पोहे चहा सोबत खायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes