चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते.

चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)

आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ सर्विंग
  1. 1 वाटीमसूर डाळ
  2. 1कांदा (बारीक चिरलेला)
  3. 1टोमॅटो (बारीक चिरलेला)
  4. 5-6कढीपत्ता
  5. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. आश्यकतेनुसार पाणी
  11. चवीनुसार मीठ
  12. सजावटी साठी कोथिंबीर
  13. 2 टीस्पूनतेल
  14. 1 टीस्पूनराई
  15. 1 टीस्पूनजिरे

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी, कुकर मधून ३ शिट्या काढून शिजवून घ्यावी.

  2. 2

    गॅस वर कढई मध्ये तेल घालून घ्या चांगले गरम झाले की राई घालून तडतडू द्यावी, आता जिरे घालून घ्या,हिंग घाला,कांदा घालून छान परतून घ्या,कांदा लालसर होत आला की टोमॅटो घालून परतून घ्या,टोमॅटो नरम होई पर्यंत शिजू द्या,आता आले लसूण पेस्ट घालून कढीपत्ता घालून घ्या,हळद, लाल तिखट,गरम मसाला घालून मिक्स करून घ्या, थोडी कोथिंबीर घालून छान एकजीव करून घ्या, कुकर थंड झाल्यावर त्यातील डाळ मॅश करून घ्या,तयार फोडणी मध्ये डाळ घालून घ्या,पुरेसे पाणी घालून व्यवस्थित परतून घ्या, चवीनुार मीठ घालून छान उकळी येऊ द्या..

  3. 3

    एक उकळी आली की गॅस स्लो करून ३-४ मिनिटे शिजू द्या, कोथिंबीर पेरून घ्या,आणि वाफाळलेला भाता सोबत गरम गरम मसूर डाळ खायला सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes