जिलेबी (jalebi recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#रेसिपीबुक
#week15

जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.

जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!

साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
10-12 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपदही
  3. 1 टीस्पूनविनेगर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 1 कपसाखर
  6. 3/४ कप पाणी
  7. 1/2 टिस्पून लिंबाचा रस
  8. 1/2 टिस्पून खायचा केशरी रंग
  9. चिमुटभर केसर
  10. 2 टेबलस्पून सजावटीसाठी बदाम काप

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये मैदा, दही, विनेगर, बेकिंग सोडा एकत्र फेटून घ्यावा. त्यात चिमुटभर केशरी रंग एड करून थोडे थोडे पाणी घालुन नीट फेटून घ्यावे.बटाटा वड्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट मिश्रण असावे. हे मिश्रण २० मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    दुसऱ्या भांड्यात साखर, पाणी, केसर काड्या घालून पाक शिजवून घ्यावा. पाकात लिंबाचा रस मिसळावा म्हणजे पाक recrystallize होत नाही.

  3. 3

    आता एका ग्लासमध्ये पाईपिंग बॅग घेऊन त्यात हे मैद्याचे मिश्रण भरावे. वरती गुंडाळून रबर लावून घ्यावा. आता कढईमध्ये तेल तापत ठेवावे. पाईपिंग बॅग चे पुढचे टोक कात्रीने कापून जिलेबी तेलात छान खरपूस तळून घ्यावी. तळलेली जिलेबी गरम असतानाच पाकामध्ये घालावी. पाकात 4 ते 5 मिनिटे ठेवून बाहेर काढून घ्यावी. गरमागरम जिलेबी बदामाचे काप घालून सर्व्ह करावी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes