सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#सावजी पाटोडी
मी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे.

सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)

#सावजी पाटोडी
मी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 2कांदे बारीक कापलेले
  3. 4 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  4. 3 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टिस्पूनखसखस
  7. 2 टीस्पूनखोबर किस
  8. 2 टीस्पूनधने पूड
  9. 2 टीस्पूनकाळा मसाला(गरम मसाला)
  10. 2-3भेंडी वेलची
  11. 2कलमी
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्य काढून घेणे. मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात कापलेल्या कांद्या मधून अर्धा कांदा ची फोडणी घाला.कांदा थोडा झाला की 2 टीस्पून आल लसूण पेस्ट टाका.

  2. 2

    मग खाकास खोबर किस टाका.आणि तेलात होऊ द्या. मग तिखट मीठ हळद धने पूड गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्यावे. मग त्यात 1 कप बेसन टाका आणि मिक्स करा. आणि बेसन छान खमंग भाजून घ्या. मग 1 कप पाणी टाकून बेसणाची उकड करून घ्या.

  3. 3

    ही बेसनाची उकड 5 मिनिट छान शिजू द्या. मग पोळपाटावर ही उकड गरम गरम पसरून थोपून घ्या. व त्याचे वड्या पाडाव्यात.

  4. 4

    ह्या वड्या तयार झाल्या नंतर परत दुसऱ्या एका कढई मध्ये तेल टाकून त्यात भेंडी वेलची आणि कलमी तेलात होऊ द्या मग कांदा आळ लसूण पेस्ट टाका.

  5. 5

    मग मसाला झाला की त्यात तिखट मीठ हळद धने पूड टाका आणि मसाला 1 मिनिट होऊ द्या. मग त्यात 1 ग्लास पाणी टाका.आणि पाण्याला उकळी येऊ द्यावी.

  6. 6

    मग रस्सा 5 मिनिट उकळून झाला की त्यात तयार पाटोडी टाका. आणि 1 उकळी येऊ द्या. आणि वरून कोथिंबीर घाला. तयार सावजी पटोडी

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes