शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (khichadi veg cutlet recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#कटलेट # सप्टेंबर मधील वर्षा इंगोले बेले यांनी केलेली शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ही रेसिपी , cooksnapकरत आहे.शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ह्या पदार्थांमध्ये थोडा बदल करून मी बनविण्याचा प्रयत्न करत आहे.

शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (khichadi veg cutlet recipe in marathi)

#कटलेट # सप्टेंबर मधील वर्षा इंगोले बेले यांनी केलेली शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ही रेसिपी , cooksnapकरत आहे.शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ह्या पदार्थांमध्ये थोडा बदल करून मी बनविण्याचा प्रयत्न करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
  1. 1 मेजरींग कप तांदळाची व मूग डाळीची शिल्लक खिचडी
  2. 1शिजलेला बटाटा
  3. 1/2 वाटीचिरलेला पालक
  4. 1/2 वाटीकिसलेले गाजर
  5. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  6. 2-3 हिरव्या मिरच्या
  7. 1 वाटीबटर मिक्सर मधून बारीक केलेले
  8. 2 टेबलस्पूनरवा
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल
  11. 1/2 वाटीशिल्लक राहिलेला भात
  12. 1 टेबलस्पूनजिरे
  13. 1 टेबलस्पूनओवा
  14. 1 टेबलस्पूनसाबुदाण्याचे पीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व्हसाहित्य एकत्र करून ठेवले. शिल्लक राहिलेली खिचडी व थोडा भात शिल्लक राहिला होता तो पण मी बारीक करून घेतला.

  2. 2

    मिक्सर मधून बारीक केलेल्या खिचडी मध्ये चिरलेली पालक, गाजराचा कीस, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, उकडलेला बटाटा,एक टेबलस्पून साबुदाण्याचे पीठ, एक टेबलस्पून जिरे,एक टेबलस्पून ओवा चवीपुरता मीठ मिक्सरमधून बारीक केलेला बटर टाकून एकत्र करून घ्यावे.मिक्सर मधून बारीक केलेले.बटर आणि रवा एका प्लेट मध्ये ठेवावे.

  3. 3

    आता या सारणाचे चपट्या आकाराचे कटलेट तयार करून घ्यावे.एका प्लेट मध्ये बारीक केलेले बटर आणि रवा या मध्ये कटलेट एक एक करून घोळून घ्यावे.

  4. 4

    आता कढई मध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर एक एक कटलेट मंद आचेवर तळून घ्यावे.घरात उपलब्ध असलेल्या पदार्थापासून कटलेट बनविले आहे. कुरकुरीत झालेले कटलेट सॉसबरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes