अरेबियन हरीसा (arabian harrisa recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक #week13 , #इंटरनॅशनल
आमच्याकडे स्वीट जास्त आवडते,
त्यामुळे बऱ्याचदा मला स्वीट डिश जास्त करावे लागतात,,,
भयंकर गोडाचे वेड आहे माझ्याकडे...
रेसिपी बुक इंटरनॅशनल थिम मुळे काहीतरी वेगळा प्रकार या वेळेला करायला मिळाला.
आगळावेगळा बेकिंग चा प्रकार आहे हा पण मला खूप जास्त आवडला आणि तसही बेकिंग करणे ही माझी आवड आहे...
त्यामुळे मलाही डिश करायला खूप आवडलं... चला तर करुया वेगळी डिश

अरेबियन हरीसा (arabian harrisa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13 , #इंटरनॅशनल
आमच्याकडे स्वीट जास्त आवडते,
त्यामुळे बऱ्याचदा मला स्वीट डिश जास्त करावे लागतात,,,
भयंकर गोडाचे वेड आहे माझ्याकडे...
रेसिपी बुक इंटरनॅशनल थिम मुळे काहीतरी वेगळा प्रकार या वेळेला करायला मिळाला.
आगळावेगळा बेकिंग चा प्रकार आहे हा पण मला खूप जास्त आवडला आणि तसही बेकिंग करणे ही माझी आवड आहे...
त्यामुळे मलाही डिश करायला खूप आवडलं... चला तर करुया वेगळी डिश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
5 सर्व्हिंग्ज
  1. 1.1/3 कप रवा
  2. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  3. 1/4 कपपातळ तूप
  4. 1/2 कपपिठी साखर
  5. 1 कपदूध
  6. 1 टेबल्स्पूनरोज सिरप
  7. 10बदाम
  8. शुगर सिरप करण्यासाठी
  9. 1/2 कपसाखर
  10. 1/2 कपपाणी
  11. 1 टेबल्स्पूनरोज सिरप
  12. 2बुंद लिक्विड कलर
  13. 1 टीस्पूनलेमन ज्यूस

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    बेक करण्याचे साहित्य सर्व काढून घेणे, रवा, बेकिंग पावडर, तूप, दूध आणि रोज सिरप हे मिक्स करून घेणे

  2. 2

    हे मिश्रण अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यास ठेवणे, त्यानंतर त्याच्यावर बदाम दाखवल्याप्रमाणे घालायचे, त्यानंतर बेकिंग टीन ला ऑइल ने ग्रीस करून त्यामध्ये हे मिश्रण बेक करण्यास ठेवणे कन्वेक्शन मोडवर वन सिक्सटी डिग्री वर चाळीस मिनिटं ठेवणे,

  3. 3

    आता शुगर सिरप करून घेऊया, त्यासाठी एका पातेल्यामध्ये साखर, लेमन ज्यूस आणि पाणी एकत्र करून घ्यायचे, साखर विरघळली की सहा ते सात उकळ्या आल्या की गॅस बंद करून द्यावा, त्यामध्ये फुड कलर आणि रोज सिरप घालावे,

  4. 4

    . आता जे मिश्रण आपण बेक करण्यास ठेवल ते तयार झाले आहे, त्यामध्ये वरून शुगर सिरप घालावे, आणि अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यास ठेवणे,

  5. 5

    आता अर्ध्या तासानंतर त्याच्या सुरीने हलक्या हाताने वड्या करून घ्यावे, आणि आपले इंटरनॅशनल स्वीट डिश छान अरेबियन हरिसा तयार आहे,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या (7)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
मस्तच, हा bosbousa सारखा प्रकार वाटला

Similar Recipes