झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week15
या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते.

झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिटे
4 सर्व्हिंग्स
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपदही
  3. 1/4 टीस्पूनखाण्याचा सोडा
  4. 1/4 टीस्पूनखाण्याचा केसरी रंग
  5. 1/2 कपसाखर
  6. तळण्यासाठी तेल
  7. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात मैदा घेऊन त्यात दही घाला. व्यवस्थित मिक्स करून त्यात खाण्याचा सोडा घाला. पुन्हा मिक्स करून घ्या.

  2. 2

    गरजेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ करून घ्या.आता यात केसरी रंग घाला. हे बॅटर 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्या.

  3. 3

    पाक बनवण्यासाठी एका भांड्यात साखर आणि पाणी घालून 10-12 मिनिटे उकळून घ्या.पाक खूप घट्ट किंवा पातळ करू नये.

  4. 4

    आता एका रिकाम्या बाटलीमध्ये मैद्याचे बॅटर घाला. बाटलीच्या झाकणाला एक छिद्र पाडून घ्या. एका सपाट बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात जिलबी पाडून तळून घ्या.

  5. 5

    तळलेली जिलेबी गरम पाकात 5 मिनिटे मुरण्यासाठी ठेवा. गरम जिलेबी मध्ये गरम पाक लगेच मुरतो. आणि गरमा गरम रसदार कुरकुरीत जिलेबी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes