चटपटीत समोसा (samosa recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad

समोसा हा प्रत्येकाचा आवडता आहे चटपटीत असेल तर अजून खायला मज्जा तर मग बघुया

चटपटीत समोसा (samosa recipe in marathi)

#cookpad

समोसा हा प्रत्येकाचा आवडता आहे चटपटीत असेल तर अजून खायला मज्जा तर मग बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
  1. पीठासाठी
  2. 2 कपमैदा
  3. 5 टेबलस्पूनओवा
  4. चवीनुसार मीठ
  5. 3 टेबलस्पूनतेल
  6. आतल्या सारणासाठी
  7. 7उकडलेली बटाटी
  8. 1/2 कपउकडलेली मटार
  9. 2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  10. 1 इंचबारीक चिरलेला आलं
  11. 6बारीक चिरलेला लसूण
  12. 2 टेबलस्पूनचाट मसाला
  13. 2 टेबलस्पूनहळद
  14. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  16. 1 टेबलस्पूनजीरा पावडर
  17. चवीनुसार मीठ
  18. तळण्यासाठी तेल
  19. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    पीठासाठी - सर्व प्रथम एका ताटात मैदा,ओवा,मीठ तेल आणि पाणी घेवून चांगलं मळून घ्या. जास्त मऊ नाही मळायच थोडं घट्टसर मळून घ्या.मग थोडं तेल लावून अजून मळून घ्या ५-१० मिनिट ठेवा.

  2. 2

    सारणासाठी- उकडलेली बटाटी चांगली कुस्करून घ्या. मग एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात आलं लसूण हिरवी मिरची चांगली परतून घ्या. मग त्यात मटार टाका. मग त्यात हळद लाल मिरची पावडर जीरा पावडर टाकून एकजीव करून घ्या. चांगलं परतून झाल्यावर मग त्यात कुस्करलेला बटाटा टाका. परत चांगलं परतून घ्या मग त्यात गरम मसाला, चाट मसाला मीठ कोथिंबीर टाका. थोड्या वेळ अजून परतून घ्या.

  3. 3

    मग सारण थंड करून घ्या. पीठ मळून ठेवलेलं थोडं मऊ झालं असेल.

  4. 4

    आता समोस्यासाठी मैद्याच्या पारी लाटण्यासाठी सुख पीठ लावून पारी लाटून घेवू थोडी उभी लाटायची मग मधून सुरीने दोन भाग करायचे.कापले गेलेल्या त्या सरळ रेषेवर पाणी लावून. मग त्या २ कडा एकमेकांवर चिटकवून कोन बनवून घ्या

  5. 5

    मग त्या कोन मधे चमच्या च्या सहाय्यने सारण भरून घ्या.आता जी पारीची मोकळी वक्राकार बाजू आहे तीलादेखील पाणी लावून घेवून. मग ती बाजू समोरच्या कोनाच्या बाजूवर चिटकवा. मग अशा प्रकारे समोसा तयार

  6. 6

    समोसे तळण्याआधी १० मिनिट न झाकता हवेवर कोरडे होऊ द्या जेणे करून तळताना त्यावर हवेचे बुडबुडे नाही येणार. समोसे तळण्यासाठी कढई मध्ये तेल गरम करावे. मग मंद ते मध्यम आंचेवर सोनेरी रंग होई पर्यंत तळून घ्या. मग मस्त गरम गरम समोसे तयार टोमॅटो केचप सोबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

Similar Recipes