रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#cooksnap
#समोसा
आज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा!

रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)

#cooksnap
#समोसा
आज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
५ जण
  1. पारीसाठी :
  2. २५० ग्राम मैदा
  3. 1/2 टिस्पून ओवा
  4. 4 टेबलस्पूनतूप
  5. 1/2 कपपाणी
  6. चवीनुसारमीठ
  7. सारणासाठी :
  8. 1 टिस्पून तेल
  9. 3हिरव्या मिरच्या
  10. १" आलं चिरलेलं
  11. 1/4 कपमटार वाफवलेले
  12. 1 टिस्पून पाणी
  13. 4मध्यम बटाटे उकडलेेले
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टिस्पून धणेपूड
  16. 1/2 टिस्पून जिरेपूड
  17. 1 टिस्पून आमचूर पावडर
  18. 1 टिस्पून तिखट
  19. कोथिंबीर

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम पारीसाठी मैदा, ओवा, मीठ व थोडे गरम केलेले तूप घालून चांगले मिक्स केले. हाताने पिठाच्या मुठी वळल्या गेल्या पाहिजेत. नंतर त्यात पाणी घालून घट्ट मळून ओल्या कपडयाने २० मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    पॅनवर तेलात चिरलेलं आलं व हिरवी मिरची परता. त्यात वाफवलेले मटार व थोडे पाणी घालून एक वाफ काढली. नंतर त्यात तिखट, धनेजिरेपूड, मीठ, उकडलेले बटाटे हाताने कुस्करून टाकले व एकजीव केले. नंतर आमचूर पावडर घातली कोथिंबीर घालून मिक्स केले. ही झाली भाजी तयार.

  3. 3

    पीठ चांगलं मळून एक गोळा घेऊन लाटा बाजूच्या कडा कापून चोकोनी आकार द्या. एका बाजूला सारण लांबट भरून घ्या. थोडं गुंडाळा आणि राहिलेल्या भागावर सुरीने उभ्या पट्ट्या अर्धवट मारून घ्या. त्या भागावर व कडेला पाणी लावून घ्या आणि तसंच पुढे गुंडाळत जायचे कडा व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजेत नंतर गोल फिरविणे दोन टोक एकमेकाला एक पट्टी घेऊन पाण्याचा हात लावून चिकटवून बंद करा. खाली दाखविल्याप्रमाणे रिंग समोसा दिसेल.

  4. 4

    मॅट समोसासाठी पोळी लाटून आयताकृती आकारात कापा नंतर त्याच्या दोन पट्ट्या लांब कापा. दोन पट्ट्या खाली दाखविल्याप्रमाणे एकावर एक ठेवा. मध्ये सारण भरून पहिली खालची एक बाजूची पट्टी सारणावर घालून कडा दाबून घ्या. नंतर वरच्या पट्टीची एक बाजू त्यावर घालून कडा पाणी लावून दाबून घ्या. आता राहिलेल्या दोन बाजू आहेत त्यांच्या पट्ट्याच्या आकारात सरळ सुरीने कापून घ्या. आता एकदा एका बाजूची पट्टी मध्ये लावा नंतर दुसऱ्या बाजूची पट्टी लावा अस करत सर्व पट्ट्या आलटून पालटून लावून कडा पाणी लावून व्यवस्थित चिकटवून घ्या.

  5. 5

    तर अश्याप्रकारे दुसरा मॅट समोसा तयार झाला आणि तिसरा आपला त्रिकोणी समोसा तयार करून घ्या. झालेले समोसे मंद गॅसवर तेलात तळून घ्या. तळल्यानंतर टिशू पेपर वर काढून घ्या.

  6. 6

    गरमागरम समोसे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes