लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#पश्चिम #महाराष्ट्र
#लिंबू मिरचीचे लोणचे
हिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात.

लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र
#लिंबू मिरचीचे लोणचे
हिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
  1. 400 ग्रॅमलिंबू
  2. 350 ग्रॅममिरच्या
  3. 5-6 टेबलस्पूनमीठ
  4. 5 टेबलस्पूनमोहरीची डाळ
  5. 1 टेबलस्पूनहळद

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    लिंबू व मिरच्या स्वच्छ धुवुन कोरड्या कापडाला एक- एक लिंबू वमिरची कोरडी पुसून घ्या. पाण्याचा अंशही रहायला नको पाणी लिहिले तर लोणचे खराब होते.लिंबू व मिरच्या चिरून (एका लिंबाच्या 8फोडी व मिरचीचे एक इंचाचे तुकडे)

  2. 2

    लिंबू मधील बि काढून घ्या. लिंबू व मिरच्या एका भांड्यात काढून घ्या.त्यात मीठ,मोहरी डाळ,हळद घालून घ्या.

  3. 3

    एकत्र करून घ्या. हे लोणचे 7_8 दिवसात मुरते.याला दिवसात दोन वेळ खालीवर हलवून घ्या. मुरले कि काचेच्या किंवा चीनी मातीच्या बरणीत भरून ठेवावे. (तुम्हाला आवडत असल्यास मुरल्यावर तेल गरम करून घालू शकता पण सपाक लोणचे असेच खातात.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes