मिरचीचे लोणचे (mirchiche lonche recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 18th week chili , achar ह्या की वर्ड साठी मिरचीचे लोणचे केले आहे.मला निरनिराळ्या प्रकारची लोणची करायला आणि खायला खूप आवडतात.वर्षभर टिकेल असे एखादे लोणचे करते.पण बाकी तात्पुरत्या स्वरुपात खाण्यासाठी म्हणजे आठवडा ,महिनाभर चालतील एवढ्या प्रमाणात लोणचे घालते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5-6पोपटी मिरच्या
  2. 1 टेबलस्पूनधणे
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1/4 टीस्पूनमेथीदाणे
  5. 1 टीस्पूनमोहरीची डाळ
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनव्हिनेगर/ लिंबूरस
  8. 2 टेबलस्पूनमोहरीचे तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    मिरच्या धुवून, पुसून, देठ काढून छोटे तुकडे करून घेतल्या.धणे जिरे,मेथीदाणे,मोहरीची डाळ छान परतून घेतले.

  2. 2

    धणे, जीरे,मेथीदाणे मिक्सर मधून बारीक करून घेतले.सर्व साहित्य तयार ठेवले.

  3. 3

    चिरलेल्या मिरच्याना मीठ,हिंग,हळद,,वाटलेला मसाला,मोहरीची डाळ घालून नीट मिक्स करून घेतले.

  4. 4

    मोहरीचे तेल गरम करून गार झाल्यावर, मसाला लावलेल्या मीरच्यांमध्ये घालून नीट मिक्स करून घेतले.

  5. 5

    लोणचे तयार झाले.पण २-३ दिवसात छान मुरल्यावर त्याची चव मस्त लागते.तयार लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवले. ८-१० दिवस पुरेल इतके लोणचे केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes