बाजरीची भाकरी (bajarichi bhakari recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

बाजरीची भाकरी आता हिवाळ्यात खायला पौष्टिक असते.. आणि आता तर भरीत भाकरीचा सिझन आहे. चुलीवर ची गरमागरम भाकरीची तर चवच न्यारी.. हि भाकर झुणका, दाळभाजी, भरीत कशाही बरोबर छान लागते. शिवाय गुळ अन तुप सोबत पण मस्त लागते... तर नक्की करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 2 मोठे वाटी बाजरीच्या भाकरी चे पीठ
  2. 1 ग्लासगरम पाणी
  3. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    बाजरीच्या भाकरीचे पीठ परातीत घ्या व त्यात थोडे मीठ घाला. एकिकडे पाणी गरम करून घ्या. (आदण)

  2. 2

    आता पीठात मध्ये विहीर सारखा गोल बनवा व त्यात थोडे गरम पाणी घाला. (अंदाजे, जास्त पाणी नको. लागले तर परत घेता येईल.) सराट्याच्या मदतीने पीठ व पाणी मिक्स करा. मग हाताने परातीत एका बाजूला दाबून लावा.

  3. 3

    आता एका गोळ्या ला लागेल एवढे पीठ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून गोळा मळून घ्या.

  4. 4

    परातीत किंवा पोळपाटावर हलक्या हाताने भाकरी थापून घ्या.. अथवा बेलनाने लाटा.

  5. 5

    आता तवा गरम झाला कि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

  6. 6

    दोन्ही बाजूंनी भाजल्यावर फ्लेमवर भाकरी शेका.. चुलीवर ची चव तर खूप छान लागते. आणि गरमागरम भाकरी भरीत, झुणका किंवा दाळभाजी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
मस्त पोष्टीक बाजरी भाकर 👌🏼👌🏼🤤

Similar Recipes