अंजीर खजूर रोल (anjeer khajur roll recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#CookpadTurns4
#cook_with_dryfruits
असे म्हटले की फक्त सणा समारम्भा ला मिळणारी मिठाई.. पण आत्ता तसे काही राहिले नाही हल्ली बाजारात हैल्दी सुगर फ़्री म्हणून सर्रास विकत मिळतात.. मग तेच सगळे जिन्नस घेउन घरीच बनवली ही मिठाई..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिट- थंड करण्यास 1 तास
16-18 नग
  1. 50 ग्रॅमखजूर बिया नसलेले
  2. 50 ग्रॅमअंजीर
  3. 20 ग्रॅममिक्स ड्राईफ्रुट
  4. 1 टीस्पूनसाजुक तुप
  5. 2चीमुट वेलची पावडर
  6. 30 ग्रॅमखोबरा कीस

कुकिंग सूचना

30 मिनिट- थंड करण्यास 1 तास
  1. 1

    खजूर अणि अंजीर बुड़ेल इतक्या पाण्यात तीन ते चार तास भिजत ठेवा. व दोन्ही ची बारिक पेस्ट अरुण घ्या. मिक्स ड्राईफ्रूट मधे थोडे थोडे काजू,पिस्ता,बदाम,आक्रोड घेउन मिक्सर मधे किंवा खलबत्यात दरदरीत करुन घ्या.

  2. 2

    एका पॅन मधे तुप घेउन त्या मधे खजूर अंजीर ची पेस्ट घाला व छान गोळा होई पर्यंत परतत रहा,गोळा होत आला की त्या मधे वेलची पूड घालून मिक्स करा गैस बन्द करा व गोळा थंड होऊ द्या.

  3. 3

    अत्ता एका प्लास्टिक च्या कग्दाला किंचीत तुप लावुन त्यावर थंड झालेला गोळा ठेवा व हातानी लांब असे एक सारखे पसरवून घ्या व त्या वर दरदरीत केले ड्राई फ्रूट घाला व त्याचा फोटो मधे दखवल्या प्रमाणे त्याचा रोल करा व थोड्या वेल म्हणजे पंधरा वीस मिनिट फ्रीज़ मधे ठेवा व मग काढुन खोबरा कीस मधे पुन्हा रोल करा अणि चिकटत नसेल तर किंचीत ओला हात लावुन रोल करा(इथे मी त्रिकोण आकार दिला आहे)अत्ता हा रोल फ्रीज़ मधे दोन तास ठेवा

  4. 4

    दोन तासानी फ्रीज़ मधून काढुन त्याचे काप करा व हो भरपुर हैल्दी सुगर फ़्री असलेली फेस्टीव मिठाई छान डेकोरेट करुन सर्व्ह करा.... अंजीर खजूर रोल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes