उपमा (upma recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा...

उपमा (upma recipe in marathi)

#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीउपमा रवा
  2. 1कांदा चिरून
  3. 1 लहानगाजर चिरून
  4. 2वाळल्या लाल मिरच्या
  5. 10-12कढीपत्ता पाने
  6. 1 टेबलस्पूनउडीद डाळ
  7. 2 टेबलस्पूनहिरवा वाटाणा
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 5-7काजू
  10. 2 टेबलस्पूनशेवया
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  13. 1 टेबलस्पूनतूप
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. चवीनुसारसाखर
  16. 1लिंबाचा रस
  17. 3 वाट्यापाणी
  18. 1/4 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री जवळ ठेवावी. गाजर, कांदा, मिरची चिरून घ्यावी. त्यानंतर गॅस सुरू करून त्यावर एका पॅनमध्ये रवा टाकून किंचित भाजून घ्यावा. रवा बाजूला काढून घ्यावा.

  2. 2

    आता त्यात तेल टाकून जीरे मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता, उडीद डाळ, शेंगदाणे, काजू टाकून सोनेरी होईपर्यंत परतावे. त्यानंतर त्यात गाजरं आणि वाटाणे टाकून एकत्र करावे. व 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.

  3. 3

    झाकण काढून आता त्यात शेवया टाकून चांगले परतून घ्यावे. थोडे परतल्यावर त्यात 3 वाट्या गरम पाणी टाकावे. व चवीनुसार मीठ घालावे. तसेच लिंबाचा रस घालावा.

  4. 4

    पाणी चांगले उकळल्यावर त्यात थोडा थोडा, भाजलेला रवा टाकून चांगले मिक्स करावे. त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी. चवीनुसार साखर टाकावी.

  5. 5

    चांगले मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ आणावी.2 मिनिटात उपमा शिजलेला असेल. झाकण काढून आता त्यात तूप टाकून चांगले मिक्स करावे. चिरलेली कोथिंबीर टाकावी. गरमागरम उपमा खाण्यास तयार आहे. चटणी, किंवा लोणचे, सोबत खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes