उडीद वडा सांबर (udid vada sambar recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#स्नॅक्स
#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर
#उडीद वडा सांबर

उडीद वडा सांबर (udid vada sambar recipe in marathi)

#स्नॅक्स
#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर
#उडीद वडा सांबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामउडीद डाळ
  2. आवश्यकतेनुसार पाणी
  3. सांबर साठी साहित्य
  4. 1 कपतूरडाळ
  5. 2कांदे
  6. 3टोमॅटो
  7. 7-8शेवगा शेंग तुकडे
  8. 1/2 कपदुधी भोपळा
  9. 2वांगी
  10. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 2 टेबलस्पूनसांबर मसाला
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. कोथिंबीर
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टीस्पूनमोहरी
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. 1-2लाल मिरची
  18. 8-10कढीपत्ता पाने
  19. 1 टीस्पूनहळद
  20. 1 टीस्पूनहिंग
  21. आवश्यकतेनुसार पाणी
  22. चटणी साठी साहित्य
  23. 1/2 कपओले खोबरे काप
  24. 1/4 कपडाळ
  25. 4-5हिरवी मिरची
  26. कोथिंबीर
  27. चवीनुसारमीठ
  28. चवीनुसारसाखर
  29. आवश्यकतेनुसार पाणी
  30. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    प्रथम डाळ 2-3 वेळा धून ती डाळ 3-4 तास भिजवून घेणे. नंतर सांबर बनवण्यासाठी कूकरच्या भांडे मध्ये तूरडाळ स्वच्छ धून घेणे. त्यात थोडे पाणी घालावे. हळद, हिंग घालून घेणे. त्याच डाळी मध्ये बारीक चिरून टोमॅटो, कांदा, वांगी घालावे. व ती डाळ कुकर मध्ये शिजवून घेणे. आणि शेवग्याचे छोटे तुकडे करावेत, भोपळा चे छोटे फोडी करून दोनीही मीठ घालून एकत्र 3-4मिनिटे शिजवून घेणे.

  2. 2

    डाळ भिजेपर्यंत सांबर करून घेणे. त्यासाठी गॅस वर पातेले ठेवावे त्या मध्ये 3 चमचे तेल गरम करून घेणे. व तेल तापले कि त्यात मोहरी, जीरे, हिंग घालावा. नंतर कढीपत्ता व लाल मिरची घालून छान परतून घेणे. आता त्यात शिजलेली तूरडाळ डावाने हटून घेऊन त्या भाजी सहित त्या फोडणी मध्ये घालून त्या मध्ये चवीनुसार तिखट, सांबर मसाला आणि मीठ घालून किती पातळ हवे आहे सांबर त्या नुसार पाणी घालावे.

  3. 3

    व त्यातच शिजवून घेतलेले शेवगा आणि भोपळा ही घालावा. आता हे सांबर मस्त 6-7 मिनिटे उकळून घेणे. व वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. सांबर तयार झाले

  4. 4

    आता चटणी करून घेणे. त्या साठी मिक्सर भांडे मध्ये ओले खोबरे काप,चवीनुसार मिरची, मीठ, आणि डाळ, कोथिंबीर आणि थोडी साखर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालावे. व बारीक वाटून घेणे. व वरून मोहरी, जीरे, कढीपत्ता यांची फोडणी घालावी. अशाप्रकारे चटणी तयार झाली.

  5. 5

    उडीद वडे तयार करण्यासाठी भिजलेली डाळ घेणे. त्यातील पाणी काढून ती डाळ पाणी न घालता एकदम बारीक मिक्सर मधून थोडी थोडी करून वाटून घेणे.गरज वाटली तरच थोडेसे पाणी घालावे. घट्ट सरच वाटून घेणे. वाटलेली डाळ एका बाउल मध्ये घेणे.

  6. 6

    आता या डाळी मध्ये आवडत असल्यास थोडी कोथिंबीर,3-4 कढीपत्ता पाने तुकडे करून आणि चवीनुसार मीठ घालणे. आता हे बॅटर 10 मिनिट छान डावाने छान फेटून घेणे. जसे फेटले जाईल तसे ते बॅटर हलके होण्यास लागते. याने वडे हलके होतात. ही स्टेप खूप महत्वाची आहे. जितके फेटून घेतले जाईल तितके ते बॅटर हलके होते.

  7. 7

    आता वडे तळण्यासाठी गॅस वर कढई ठेवावी व तेल गरम करण्यास ठेवावे. नंतर वडे करण्यासाठी एका छोटया वाटीत पाणी घेणे. व एक डाव घेणे तो डाव उलट्या बाजूने वाटीतील पाण्यात अलगद ओला करून घेणे.

  8. 8

    व त्या वर डाळचे मिश्रण चमच्या ने किंवा थोडा हात ओला करून त्या वर ठेवणे व बोटाने त्याला छोटे मध्ये होल पाडून घेणे.व हा वडा अलगद तापलेल्या तेला मध्ये सोडावा. अशाप्रकारे सगले वडे करून घेणे.

  9. 9

    मध्यम आचेवर सोनेरी रंगावर वडे तळून घेणे. व गरम गरम सांबर आणि चटणी सोबत सर्व्ह करावे. खूप छान वडे या डावा च्या मदतीने घातले जातात.

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes