उडीद वडा उत्तराखण्डी (udid vada uttarakhandi recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#स्नॅक्स
#उडीद_वडा #उत्तराखण्डी

उडीद वडा म्हणजे सर्वांचा जीव की प्राण! सांबार मध्ये घाला की दह्यात, त्याची चव आणखीच रेंगाळते जिभेवर!

मी उत्तराखंड मध्ये अनेक वर्षे वास्तव्य केले असल्याने म्हटले, उडीद वड्याचे तिथले लोकप्रिय रूपही Cookpad च्या भगिनींना दाखवावे.

उडीद वडा उत्तराखण्डी (udid vada uttarakhandi recipe in marathi)

#स्नॅक्स
#उडीद_वडा #उत्तराखण्डी

उडीद वडा म्हणजे सर्वांचा जीव की प्राण! सांबार मध्ये घाला की दह्यात, त्याची चव आणखीच रेंगाळते जिभेवर!

मी उत्तराखंड मध्ये अनेक वर्षे वास्तव्य केले असल्याने म्हटले, उडीद वड्याचे तिथले लोकप्रिय रूपही Cookpad च्या भगिनींना दाखवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ माणसे
  1. 1 वाटीउडीद डाळ
  2. 1कांदा
  3. 1/2 चमचाआले लसूण पेस्ट
  4. 1हिरवी मिरची
  5. 1/2 चमचातिखट
  6. 1/2 चमचाजिरेपूड
  7. 1/2 चमचागरम मसाला
  8. 1मूठ कोथिंबीर
  9. 2 चमचेपांढरे तीळ
  10. 2 चमचेकाळे जीरे

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ ५-६ तास भिजवून पाणी काढून बाजूला ठेवावे. डाळ मिक्सर वर बारीक वाटून घ्यावी.

  2. 2

    कांदा, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. वाटलेल्या डाळीत कांदा, मिरची, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण छान फेटून घ्यावे.

  3. 3

    एका ताटलीत पांढरे तीळ आणि काळे जीरे पसरून ठेवावे. बोटांना पाणी लावून मिश्रणाचे छोटे वडे बनवून एका बाजूने तीळ आणि जिऱ्या मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. असे सगळे वडे तळून घ्यावेत.

  4. 4

    खायला एकदम रेडी आहेत गरमागरम उडीद वडा उत्तराखण्डी. याच्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी किंवा सॉस सर्व्ह करू शकता. पण मला तरी याच्या अप्रतिम चवीला गालबोट लावावेसे नाही वाटत. नक्की करा, खायला द्या, उडीदवडा उत्तराखण्डी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes