पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)

#लंच
पिठल भाकरी म्हणजे आमच्या विदर्भातील स्पेशल डिश म्हटले तरी चालेल. रात्रीच्या जेवणाला भाजी बनवायला काही नसले की पटकन होणारा पदार्थ म्हणजे पिठल आणि त्याचा सोबतीला गरम गरम तव्यावरून ताटात टाकलेली भाकरी आणि सोबतीला हिरव्या मिरच्या चा ठेचाआणि कांदा म्हणजे जेवणाची मजा काही औरच असते. आणि अशा प्रकारचा जेवणाचा बेतअसेल तर पंचपकवानांची गरजच नाही.
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच
पिठल भाकरी म्हणजे आमच्या विदर्भातील स्पेशल डिश म्हटले तरी चालेल. रात्रीच्या जेवणाला भाजी बनवायला काही नसले की पटकन होणारा पदार्थ म्हणजे पिठल आणि त्याचा सोबतीला गरम गरम तव्यावरून ताटात टाकलेली भाकरी आणि सोबतीला हिरव्या मिरच्या चा ठेचाआणि कांदा म्हणजे जेवणाची मजा काही औरच असते. आणि अशा प्रकारचा जेवणाचा बेतअसेल तर पंचपकवानांची गरजच नाही.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा बारीक चिरून घेतला. नंतर कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली.कांदा टाकला.कांदा परतून घेतले नंतर त्यामध्ये बारीक केलेले लसूण टाकला व चांगल्या प्रकारे होऊ दिला.
- 2
नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद टाकली व परतून घेतले.नंतर त्यामध्ये पाणी टाकले.व पाण्याला उकळी आल्यावर.
- 3
पाण्याला उकळी आल्यावर त्यात बेसन थोडे थोडे सोडले.व चमचानी फिरवून घेतले.व चांगल्या प्रकारे चमचा नी किंवा रवी फिरवून घ्यावे कि जेणेकरून बेसनाच्या गुठल्या होणार नाही.५ते १०मिनिट कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर बेसन होवू द्यावे.
- 4
अशाप्रकारे झटपट पिठल तयार झाल्यानंतर भाकरी सोबत सर्व्ह करावे.पिठल भाकरी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पिठल_भाकरीपिठल भाकरी ही रेसिपी सगळ्यांचीच आवडती.अगदी सद्ध्या चुलीवरच पिठल भाकरी हे तर लोक आवडीने खायला जातात. सोबत मिरची कांदा हवाच..😋चला तर मग रेसिपी बघुया..👇 जान्हवी आबनावे -
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
खान्देशी पिठल/बेसन (pithla recipe in marathi)
#KS4खान्देशी भाग म्हणजे जळगाव, धुळे हा भाग आठवतो. या भागातील लांब वांगी खूपच प्रसिद्ध आहेत. आणि भरित ही खूप फेमस. तसेच इकडे बनवल जाणार तिखट बेसन किंवा पिठल ही कळण्याच्या भाकरी सोबत खूप चवीने खाल्ल जातं. चला तर मग बनवूयात खान्देशी पिठल किंवा बेसन. Supriya Devkar -
पन्हाळा स्पेशल पिठलं, भाकरी, ठेचा (pithla bhakri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत...यासाठी पन्हाळ्याला अनुभवलेला पाऊस,गरम गरम भुट्टा आणि गडावरची पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा असा आठवणींचा बराच साठा आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी दर्शन, म्युझियम,,रंकाळा, राजाभाऊंची भेळ,फडतरे मिसळ हे झाल्यावर ज्योतिबा चं दर्शन आणि बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पुतळ्या वरून पुढे पन्हाळा दर्शन .... असं ४-५ वेळा तरी केलं आहे.पन्हाळ्याला पावसातील वातावरण अगदीच मोहक..गड जणू दिसतच नाही ,सगळीकडे धुकं,जोरदार वारा...आणि गंमत सांगायची तर आपल्याकडे छत्री असूनही उपयोग नसतो,इतका वारा असतो की एकतर छत्रीच उडून जाते किंवा जरी छत्री घट्ट पकडून ठेवली तरीसुद्धा आपण चिंब भिजून जातो... अंग शहारून निघतं...अशा वातावरणात शेगडीवरचा गरम गरम भुट्टा खावासा नाही वाटला तर नवलच..एवढं फिरून अंग गार पडल्यावर नजर आपसूकच गरम गरम पिठलं, भाकरी, झणझणीत ठेचा खाण्याकडे वळते.यासोबत कांदा आणि दहीसुध्धा दिले जाते.कितीही वाफाळलेले पिठले असले तरी अशा पावसाळी वातावरणात ताटात वाढून घास तोंडात जाईपर्यंत जवळ जवळ गारच होते...पण ते सर्व खाण्याची मजा काही औरच....रेसिपी बुक चा निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तसाच मेनू बनवला ...पिठलं बरचसं तिथल्या सारखंच पण थोडासा माझा टच दिला..... Preeti V. Salvi -
-
पिठलं-भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच1.सोमवार- पिठलं-भाकरीथंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची भाकरी आणि पिठलं, लसणाची चटणी, कांदा , गुळ बटाट्याची रस्सा भाजी ,जबरदस्त ..... Gital Haria -
-
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंचजगात कुठेही जावा..मराठी माणसाला पिठलं भाकरी खाल्यावर जे काही समाधान मिळते ते सांगता येत नाही.. अहाहा.☺️☺️माझ्यासाठी ही तर खूपच भारी डिश आहे...बर्गर, पिझ्झा, चाट असे आम्ही रोज नाही खाऊ शकत बट रोज भाकरी खाऊ शकतो...तशीच मी आज नाचणी ची भाकरी आणि पिठलं बनवले आहे ..नाचणी कॅल्शियम चे स्तोत्र असते सो म्हणले याच्या भाकरी करू... Megha Jamadade -
कोल्हापूरी रावण पिठलं भाकरी (Kolhapuri ravan pithla bhakri recipe in marathi)
#लंच#सोमवार- पिठलं भाकरीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पहिली रेसिपी.आपण नेहमी पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरी ही नावं ऐकत आलो आहेत. पण कधी रावण पिठलं हे नाव ऐकल का ? 🤔 कोल्हापूरमधील हा लोकप्रिय पदार्थ.नेहमीच्या पिठल्यापेक्षा थोडा झणझणीत असते पिठलं. घरातल्या मोजक्या साहित्यापासून बनवता येणारी , जिभेला चव येईल असा हा पदार्थ यामध्ये बेसनाच्या समप्रमाणात तिखट आणि तेल घालतात.पण मी या पिठल्यामधे बेताचं तिखट वापरलं आहे. Deepti Padiyar -
पिठलं (Pithla Recipe In Marathi)
#BPRपिठलं हा महाराष्ट्रातील मुख्य असा जेवणाचा पदार्थ आहे गावाकडील जवळपास सगळ्याच लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे शेतकऱ्याचा तर हा मूळ असा जेवणाचा पदार्थ आहे. पिठलं भाकरी ठेचा हा परफेक्ट असा मेनू आहे.रात्रीच्या जेवणातून पिठलं भाकरी म्हणजे पौष्टिक असा जेवणाचा प्रकार आहे.करायलाही अगदी झटपट असा तयार होतो.बऱ्याच जणांना भाताबरोबर पिठले खूप आवडते माझ्याकडे पिठलं भाकरी आणि ठेचा ठरलेलाच असतो.माझ्या सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पिठलं आणि भाकरी मला खूप आवडतो माझ्या आज्जी मुळे मला या जेवणाची खूप सवय आहे.अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले पिठले रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
पिठल भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#HLR सणवार आले की खूप गोडधोड खाल्ले जाते आणि मग अगदी साधं हलकं जेवण करण्याची इच्छा होते पिठलं भाकरी अशी रेसिपी आहे जी बनवायला सोपी पचायला हलकी आहे म्हणून चला मग बनवूयात पिठल भाकरी. Supriya Devkar -
पिठल - भाकरी (pithala bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र पिठल भाकरी महाराष्ट्रातील लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
टोमॅटोचे पिठले आणि कळण्याची भाकरी (kanda tomatoche pithla ani kadynachi bhakri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरीमस्त आवडता बेत.....पिठले आणि भाकरी.... Supriya Thengadi -
-
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
आज मी वांग्याचे भरीत करत आहे. पातीचा कांदा,मटार ,टोमॅटो,हिरव्या मिरच्या टाकलेले हे भरीत ज्वारीच्या भाकरी बरोबर ठेचा किंवा कोशिंबीर बरोबर खाल्ले तर जेवणाची मजा काही निराळीच असते. rucha dachewar -
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात विविध पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्याबरोबर शरीराला गरम अशी ही बाजरीची भाकरी असली आणि कुठल्याही पालेभाजीचा पिठलं असलं की बस! जेवणाची रंगत काही न्यारीच येते. Anushri Pai -
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
मेथीचे पिठलं -भाकरी (methichya pithla bhakhri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मेथीचे पिठलं -भाकरी रेसिपी#पोस्ट 2 Rupali Atre - deshpande -
-
लसुनी पिठलं व मिक्सपिठाची भाकरी (ladin pithla v mix pithachi bhakri recipe in marathi)
#लंच#सोमवार पिठलभाकरीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधली#पहिली रेसिपी.....अतिशय आवडता मेनू व मी साईबाबा व स्वामी समर्थांची उपासक असल्याने त्यांचा आवडता पदार्थ त्यात मार्गशिष्य महिना उद्या दत्त जयंती खूप आनंदाने पिठलं भाकरी करून देवांला नैवेद्य दाखवून जेवले.मी ज्वारी बाजरी नाचणी सम प्रमाणात दळून त्याची भाकरी कारते अतिशय रुचकर व पौष्टिक होते.पिठलं फक्त लसूण घालून कराते गरम पिठलं भाकरी ताक म्हणजे अहाहा मेजवानीच ,खास त्यासाठी मी लोखंडी कढई तवा कालथा नाशिकहून आणलाय व नेहमी वापरते Charusheela Prabhu -
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGRविशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊 Manisha Satish Dubal -
गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
#LCM1गावाकडील सर्वात प्रिय न्याहरी म्हणजे झुणका भाकर. मग झुणका ओला आसो किंवा सुखा कांद्यावरच बरोबर गरम गरम भाकरी आणि कच्चा कांदा.... वाह!!! अगदी तोंडाला पाणी सुटले. SHAILAJA BANERJEE -
पालकाचे पिठलं- भाकरी. (palkache pithla bharkhri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरी#सोमवारपिठलं भाकरी हा सर्वांच्या आवडीचा बेत.. कधीही घाईघाईत असताना किंवा बाहेरून पटकन आल्यावर लवकर होणारी रेसिपी म्हणजे पिठले...तसे पिठले खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जाते. आज मी पालकाचे पिठले केले आहे.त्याचे झालं असे रेगुलर चेक अप साठी म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. तर त्यांनी हिमोग्लोबिन कमी झाल्याचे सांगितले. आणि सोबतच पालक, बीट चे सेवन जास्त प्रमाणात करायच याची सुध्दा ताकीद दिली... त्यामुळे मग पालक कुठे कुठे आणि कुठल्या प्रकारे आहारात वापरता येईल याचा सतत मनी विचार चालू असतो. आणि तसेही साप्ताहिक लंच प्लॅनर साठी पिठलं भाकरी ची थीम. मग काय पालकाचे पिठले करण्याचा केला प्लॅन.. पण त्यातही एक अडचण होतीच... मुलीला बिलकुल पालक आवडत नाही. मग त्यावर उपाय शोधला पालक थोडी ब्लांच करून, त्याची प्युरी करून, ती पिठल्यात घातली आणि काय भन्नाट झाले म्हणून सांगू चवीला आणि सोबत गरमा गरम भाकर आहाहा.. 😋तेव्हा नक्की ट्राय करा पालकाचे पिठलं भाकरी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
गरमागरम पिठलं भात (pithla bhat recipe in marathi)
धो धो पडणारा पाऊस आणि गरमागरम पिठलं भात हे माझं आवडतं समीकरण....😊पिठलं भात खाण्याची खरी मजा येते ती ,मुसळधार पावसात...😊गरम पिठलं भात आणि सोबतीला एक पापड जरी असला तरी खूप झालं...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
#GRपिठलं भाकरी ,हा पदार्थ पंचपक्वान्नापेक्षा कितीतरी टेस्टी , लाजवाब पोटभरीचा पदार्थ..😋😋रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की, पिठलं भाकरी खाऊन मन खरंच तृप्त होते. Deepti Padiyar -
हाटुन पिठले आणि भाकरी (pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लॅनर #सोमवार_ पिठले भाकरी"हाटुन पिठले आणि भाकरी"ते आता तुम्ही म्हणाल हाटुन पिठलेम्हणजे काय...हे पहिलेच आहे.. फक्त बेसन पीठ भिजवून न करता आदणात म्हणजेच फोडणी करून पाणी टाकून ते उकळले की एका हाताने पीठ सोडून दुसऱ्या हाताने हाटुन घेणे.. ढवळून घेणे.. आमच्या गावाकडेे जास्त वेळा बनवले जाते.... माझ्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या... किती सुंदर, मजेशीर दिवस होते हो..सगळी माणसं एकमेकांशी खुप आपुलकीने वागत.. लग्न कार्य म्हटलं की पंधरा दिवस माणसांनी घर खचाखच भरलेले असायचे.. जुन्या काळात लग्न कार्यात घरात भरपूर पाहुणे असायचे.. लग्नाच्या दिवशी गोडाधोडाचे जेवण आचाऱ्याकडुन करून घेतले जायचे..पण इतर दिवसांना मात्र नातेवाईकांमधील भाऊबंद गोतावळ्यातील स्त्रिया मदतीला यायच्या.. आणि ठरलेला मेनू असायचा हाटुन पिठले, भाकरी,खुरासने चटणी.. आणि बुक्का मारुन फोडलेला कांदा.. पण खुप मजा असायची त्या जेवणाची... गप्पा गोष्टी करत, एक मेकांची मस्करी करत, हास्यविनोद करत सगळे आनंदाने पिठलं भाकरी चा आस्वाद घ्यायचे... आताच्या काळात माणसं माणसाशी बोलणं सुद्धा टाळतात हो.. लग्न कार्य असेल तर डायरेक्ट हाॅलवर जाणे...जवळची पाच, दहा जण असतात फक्त घरात.. शहरांमध्ये जागेच ही प्राॅब्लम असते म्हणा... असो ...आपला विषय बाजुलाच राहिला... तर हे हाटुन पिठल्याची गोष्ट खुपच लांबली.. आता बघुया हाटुन पिठल्याची रेसिपी.... लता धानापुने -
मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
#mfrबाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍 Preeti V. Salvi -
बेसनच पीटल (besanch pithla recipe in marathi)
गरम गरम भाकरी आणि पीटल खाताना लहान पणिची आठवण आली Madhuri Jadhav
More Recipes
- अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
- ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
- मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)
- साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
- कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
टिप्पण्या